सातारा परिसरात भर पावसाळ्यात पाण्याचा ठणठणाट; चिखलामुळे टँकरही येईनात
By साहेबराव हिवराळे | Updated: August 11, 2023 18:43 IST2023-08-11T18:43:06+5:302023-08-11T18:43:31+5:30
रस्ता सुरळीत नसल्याने सातारा पाणीपुरवठ्याच्या विहिरीत टाकण्यात येणारे टँकर चिखलात रुतून बसते.

सातारा परिसरात भर पावसाळ्यात पाण्याचा ठणठणाट; चिखलामुळे टँकरही येईनात
छत्रपती संभाजीनगर : सातारा गावातील पाणीपुरवठा विहिरीत भर पावसाळ्यातही पावसाअभावी मनपाच्या वतीने टँकर लावून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु टँकर चिखलात रुतल्याने तो विहिरीपर्यंत घेऊन जाण्यासाठी चालक व पाणीपुरवठा करणाऱ्या लाइनमनला कठीण जात आहे. विहिरीला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाई कायम आहे.
रस्ता थोडा चढाचा व चिखलामुळे खराब झाला आहे, टँकर त्या ठिकाणी फसते. त्यामुळे पंधरा दिवसांपासून टँकर येणे बंद झाले. टँकर येत नसल्याने विहिरीत पाणी नाही. महापालिकेने या ठिकाणी खडी टाकून हा रस्ता नीट केल्यास टँकरने पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे विनोद सोळणर, आकाश गढवे, गणेश साबळे, गिरीश पवार, शेख ईसाक, राम काळे, आदी नागरिकांचे म्हणणे आहे.