आरटीओ कार्यालयात गोंधळाचे वातावरण
By Admin | Updated: September 7, 2014 00:42 IST2014-09-07T00:39:48+5:302014-09-07T00:42:00+5:30
औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात शनिवारी पासिंग नसणाऱ्या रिक्षांवर करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईमुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

आरटीओ कार्यालयात गोंधळाचे वातावरण
औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात शनिवारी पासिंग नसणाऱ्या रिक्षांवर करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईमुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. योग्यता प्रमाणपत्रांसाठी विलंब झाल्यास दररोज १०० रुपये याप्रमाणे दंडाची रक्कम आकारण्यात येत असल्याने रिक्षाचालकांनी त्यास विरोध केला. रिक्षांच्या किमतीपेक्षाही अधिक दंड होत असल्याने तो भरायचा कसा, असा प्रश्न रिक्षाचालकांनी उपस्थित केला.