तीन मजली इमारतीवरून पडलेल्या महिलेची प्रकृती स्थिर
By Admin | Updated: June 28, 2014 01:15 IST2014-06-28T00:35:50+5:302014-06-28T01:15:55+5:30
लातूर : शहरातील शासकीय वसाहतीतील तीन मजली इमारतीवरुन कोसळून जखमी झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर आहे़ तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत़

तीन मजली इमारतीवरून पडलेल्या महिलेची प्रकृती स्थिर
लातूर : शहरातील शासकीय वसाहतीतील तीन मजली इमारतीवरुन कोसळून जखमी झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर आहे़ तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी पोलिसांत कुठलीही फिर्याद देण्यात आली नसल्याने शुक्रवारी गुन्हा दाखल झाला नाही़
लातुरातील बार्शी रोडवरील शासकीय वसाहतीतील इमारत क्रं़ ३ मध्ये तुकाराम मुडे यांच्या पत्नी वैशाली तुकाराम मुडे ह्या मुलगा गणेश उर्फ नामदेव मुडे यास कडेवर घेऊन छतावर धुणे वाळू घालत होत्या़ तेव्हा त्यांची मतिमंद मुलगी सोनाली मुडे ही इमारतीच्या कठड्यावरून ओरडल्याने तिच्या मातेचे लक्ष केंद्रित झाले़ दरम्यान, मुलगी कोसळत असल्याचे पाहून मातेने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, तिचाही तोल गेल्याने तिघेही जमिनीवर कोसळले़ यात सोनाली व गणेश ही दोन मुले गतप्राण झाली़ माता वैशाली ही गंभीर जखमी झाली़ वैशाली यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ (प्रतिनिधी)