दर्शनासाठी व्हावे लागणार संगणक साक्षर
By Admin | Updated: July 14, 2014 00:59 IST2014-07-13T23:41:30+5:302014-07-14T00:59:31+5:30
मोहन बारहाते , मानवत आधुुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना संगणक साक्षर व्हावे लागणार आहे

दर्शनासाठी व्हावे लागणार संगणक साक्षर
मोहन बारहाते , मानवत
आधुुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना संगणक साक्षर व्हावे लागणार आहे आणि ही काळाची गरज झाली आहे. यामुळे भक्तांचा वेळ, श्रम आणि पैसाही वाचणार आहे. त्यामुळे आधुनिक युगात भाविकांना निरक्षर राहता येणार नाही.
दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरची यात्रा भरते. भागवत धर्मात आषाढी एकादशीला विशेष असे स्थान आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातूूनही पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मीनीच्या दर्शनाला आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक येतात. आळंदी ते पंढरपूर लाखो वारकऱ्यांची दिंड्याही पंढरपुरात दाखल होतात. परंतु या दिंड्यातील वारकऱ्यांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागते. त्यामुळे पंढरपूरच्या संस्थानने एक वेबसाईट काढून विठ्ठल दर्शनाची पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी ६६६.५्र३३ँं’१४‘ँे्रल्ल्रंि१२ँंल्ल.ूङ्मे. यावर जाऊन दर्शनाच्या पंधरा दिवसांपूर्वी आॅनलाईन फॉर्म भरावा लागतो. त्यासाठी भाविकाचा एक फोटो आणि मोबाईल नंबर द्यावा लागतो. सदरील आॅनलाईन फॉर्म भरल्यानंतर एक दर्शन पास मिळतो.
या पासवरून त्या भाविकास विठ्ठल रुक्मीनीचे अर्ध्या तासात दर्शन होते. या सुविधेमुळे भाविकांना पंढरपुरात रूम करून राहण्याची व वेळ खर्च करण्याची गरज पडत नाही. परंतु आॅनलाईन पासची संख्या मर्यादित असल्याने पासही लवकर संपतात. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ असणाऱ्यांना तत्काळ व वेळेच्या आत पास मिळवावा लागतो.
पंढरपूराकडे जाणारा वारकरी हा सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि दीनदुबळा असतो. त्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड बसू शकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य वारकऱ्याला त्याचा लाभ मिळेल की नाही? हे सांगता येत नाही. परंतु आधुनिक काळातील ज्ञानतंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्यालाही विठ्ठलाचे दर्शन लवकरात लवकर घेता येणार आहे. परंतु त्यासाठी त्याला संगणक साक्षरताही अंगीकारावी लागेल. (वार्ताहर)