सहायक कुलसचिव पदाच्या मुलाखती पूर्ण
By Admin | Updated: July 28, 2015 01:22 IST2015-07-28T01:01:18+5:302015-07-28T01:22:35+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सहायक कुलसचिवपदाच्या चार जागांसाठी झालेल्या मुलाखतींमध्ये दोन उमेदवारांची निवड करण्यात आली.

सहायक कुलसचिव पदाच्या मुलाखती पूर्ण
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सहायक कुलसचिवपदाच्या चार जागांसाठी झालेल्या मुलाखतींमध्ये दोन उमेदवारांची निवड करण्यात आली. मात्र, या प्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर निवड जाहीर केली जाणार आहे.
सहायक कुलसचिवपदासाठी चार जागा होत्या. खुल्या वर्गातील तीन जागांसाठी दोघांनी मुलाखत दिली. त्यापैकी एक पद भरण्यात आले. मात्र, या प्रकरणी लेखी परीक्षेत डावलण्यात आलेले एक उमेदवार न्यायालयात गेले आहेत.
लेखी परीक्षेत गुणवत्ता यादीत सर्वप्रथम असूनही डावलले असल्याचा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर निवड जाहीर होईल, असे प्रभारी कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले.