गुप्तधनप्रकरणी अखेर गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 7, 2014 00:43 IST2014-11-07T00:22:12+5:302014-11-07T00:43:05+5:30
केज : १ नोव्हेंबर रोजी साळेगाव येथे मातीचे खोदकाम करताना गुप्तधन आढळले होते़ मात्र गुप्तधन लपूवन ठेवून त्या जागी बनावट २४ कर्णफुले ठेवून गुप्तधनावर डल्ला मारण्यात आला होता़

गुप्तधनप्रकरणी अखेर गुन्हा दाखल
केज : १ नोव्हेंबर रोजी साळेगाव येथे मातीचे खोदकाम करताना गुप्तधन आढळले होते़ मात्र गुप्तधन लपूवन ठेवून त्या जागी बनावट २४ कर्णफुले ठेवून गुप्तधनावर डल्ला मारण्यात आला होता़ हे प्रकरण ‘लोकमत’ने लावून धरले होते़ पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करून गुरूवारी गुन्हा नोंद केला़
साळेगाव येथील घर क्र. ६७ मधील माती खोदकाम करताना तीन मजुरांना मिळून आलेला तांब्या गुप्तधनासह आरोपी मुबीन इक्बाल सय्यद याने सदरील गुप्तधनाचा तांब्या शासनाकडे जमा न करता अपहार करून अन्यायाने विश्वासघात करून मिळालेले गुप्तधन लबाडीने व चोरीच्या उद्देशाने स्वत:कडे ठेवून त्याऐवजी बाजारात नकली २४ कर्णफुले ते सोन्याचेच आहेत, असे भासवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या फिर्यादीवरून मुबीन इक्बाल सय्यद विरूद्ध गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मुबीन इकबाल याला जेरबंद करण्यात आले आहे.(वार्ताहर)