आयुक्तांची नगररचना विभागात झाडाझडती

By Admin | Updated: September 16, 2014 01:36 IST2014-09-16T01:17:56+5:302014-09-16T01:36:35+5:30

औरंगाबाद : मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी आज नगररचना विभागात तब्बल पाऊणतास संचिकांची झाडाझडती घेतली. त्यांनी इमारत क्रं.३ मध्ये दीडतास पाहणी करून

The Commissioner of the Municipal Commissioner planted in the municipal area | आयुक्तांची नगररचना विभागात झाडाझडती

आयुक्तांची नगररचना विभागात झाडाझडती



औरंगाबाद : मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी आज नगररचना विभागात तब्बल पाऊणतास संचिकांची झाडाझडती घेतली. त्यांनी इमारत क्रं.३ मध्ये दीडतास पाहणी करून कर्मचाऱ्यांची व विभागाची ओळख परेड घेतली, तसेच इमारतीच्या छतावरून पाठीमागील नाल्याची पाहणी केली.
नगररचना विभागात आयुक्तांनी उपअभियंता शिरीष रामटेके यांच्याकडून बांधकाम परवानग्या, टीडीआरची माहिती घेतली. सहायक संचालक नगररचना डी.पी. कुलकर्णी आज पालिकेत नव्हते. त्यांच्या गैरहजेरीत आयुक्तांनी विभागाची झाडाझडती का केली. यावरून पालिकेत तर्कवितर्क लढविले जात होते. शहर अभियंता एस.डी. पानझडे, उपअभियंता अफसर सिद्दीकी आदींची उपस्थिती होती. पालिकेत फेबु्रवारीमध्ये टीडीआर प्रकरणातून मोठा गदारोळ झाला होता. पेठेनगरमधील त्या टीडीआरमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोळ झाल्याचे आरोप प्रशासनावर झाले होते. तत्कालीन आयुक्त डॉ.कांबळे यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून टीडीआर थांबविला. त्यानंतर भोगवटा आणि गुंठेवारी विभागातील प्रकरणातूनही नगररचना विभाग संशयाच्या भोवऱ्यात आला. नगररचना विभागात सध्या दरमहा २ ते ३ बांधकाम संचिका मंजूर होत आहेत. पालिकेचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात हा विभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे विभागातून जास्तीचे उत्पन्न मिळण्यासाठी आयुक्त प्रयत्न करीत आहेत. त्या अनुषंगाने आयुक्तांनी नगररचना विभागातील संचिका पाहिल्या. त्यानंतर प्रशासकीय विभागातील खुर्च्या बदलण्याचे त्यांनी आदेश दिले. कर आकारणीसाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. पालिकेत कर आकारणी वर्षानुवर्ष मुख्यालयात होते. असे शहर अभियंत्यांनी आयुक्तांना सांगितले. त्यानंतर त्यांनी इमारत क्र.३ वरून टाऊन हॉल व पाठीमागील नाल्याची पाहणी केली. सहायक आयुक्त रोशन मकवाने यांनी काही कार्यालयीन साहित्याची त्यांच्याकडे मागणी केली. प्रभाग अ मध्ये समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराने थाटलेल्या वसुली कार्यालयाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
प्रशासकीय कामकाजाची इमारतीत पाहणी बऱ्याच वर्षांनंतर झाली आहे. आयुक्त महाजन यांनी पाहणी केल्यामुळे तत्कालीन आयुक्त सतीश त्रिपाठी, मुन्शीलाल गौतम यांची आठवण काही जुन्या कर्मचाऱ्यांना झाली.
४आयुक्तांनी इमारत क्र.३ मध्ये ओळख परेड घेतल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. विभागात अनेक कर्मचारी आलेले नव्हते, तर काही जण बाहेर गेलेले होते. आयुक्तांनी अचानक पाहणी करून विभागात कोण काय करते, याचा आढावा घेतला.

Web Title: The Commissioner of the Municipal Commissioner planted in the municipal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.