शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दिलासादायक ! १०८ रुग्णवाहिकेने ८ महिन्यांत १५ हजार रुग्णांचे वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 14:13 IST

जिल्ह्यात ३१ रुग्णवाहिका आहेत.

ठळक मुद्दे८ हजार कोरोनाबाधितांना मदत  ४८  महिलांची रुग्णवाहिकेत प्रसूती

औरंगाबाद : जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिकांनी गेल्या ८ महिन्यांत वेळेत रुग्णालयांत पोहोचून तब्बल १५ हजार ८३५ रुग्णांचे प्राण वाचविले. यात ८ हजार ५९९ कोरोनाबाधित रुग्णांचाही समावेश आहे.  रुग्णसेवेसाठी रात्रंदिवस या रुग्णवाहिका धावत आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गंत राज्यस्तरीय नियुक्त सेवा पुरवठादार भारत विकास ग्रुप व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यात ३१ रुग्णवाहिका आहेत. तर यातील चालक व डॉक्टरांची संख्या १२८ आहे. आजार, अपघातासह कोणतीही आपत्कालीन स्थिती, अडचण असेल तर पहिला फोन हा १०८ रुग्णवाहिकेला केला जातो. फोन आल्यानंतर काही मिनिटांत ही रुग्णवाहिका मदतीसाठी दाखल होते. गर्भवती माता, अपघातग्रस्त रुग्णांना याचा फायदा होतो. यासाठी रुग्णवाहिकेचे चालक, डॉक्टर महत्वाची भूमिका निभावत आहेत. कोरोना काळात रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका मिळेल, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक ओमकुमार कोरडे, डॉ. गौरव शेळके, डॉ. अतुल मुरुगकर यांनी यासाठी प्रयत्न केले. 

कोरोनाग्रस्तांसाठी धावल्या  १४ रुग्णवाहिकाकोरोना रुग्णांना रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी १४ रुग्णवाहिका राखीव ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन होते. तेव्हा सर्व वाहतूक बंद होती. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांना घरी पोहोचविण्यासाठीही या रुग्णवाहिकांनी महत्वाची भूमिका निभावली.

अपघातातील रुग्णांना वेळीच मदतकोरोना रुग्णांना सेवा देण्यासह अपघातग्रस्तांना वेळीच उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिका धावल्या. कोरोनाच्या गेल्या ८ महिन्यांत ४८ गर्भवती महिलांची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. प्रसूतीनंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सहा वर्षांपासून सेवाऔरंगाबाद जिल्ह्यात २०१४ पासून १०८ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. आतापर्यंत २ लाख ८५ हजार रुग्णांना वेळेत रुग्णालयांत पोहोचविण्यात आले. कोविड काळात रुग्णसंख्या वाढली होती. या सगळ्यात सेवा सुरळीत राहिली.- ओमकुमार कोरडे, समन्वयक, ईएमएस

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबाद