डेंग्यूसाठी पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन

By Admin | Updated: September 12, 2014 00:31 IST2014-09-12T00:17:08+5:302014-09-12T00:31:38+5:30

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यू नियंत्रणासाठी पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन सुरू केले आहे

Combing operation again for dengue | डेंग्यूसाठी पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन

डेंग्यूसाठी पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यू नियंत्रणासाठी पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन सुरू केले आहे. आॅगस्ट महिन्यात दोन आॅपरेशन करूनही डेंग्यू व साथरोग आटोक्यात आले नाहीत. त्यामुळे १३ सप्टेंबरपर्यंत साथरोगसदृश भागात अ‍ॅबेट वाटप, फॉगिंगचा आराखडा मनपाने तयार केला आहे. तसेच आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी खाजगी डॉक्टर्सची बैठक घेऊन कार्यशाळा आयोजनाच्या अनुषंगाने चर्चा केली.
पवननगर, श्रीकृष्णनगर, मयूरनगर, यादवनगर, हर्सूल, वानखेडेनगर, जाधववाडी, सिडको एन-८, अयोध्यानगर, ब्रिजवाडी या विभागात व प्रभाग ‘ई’ मधील पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, अंबिकानगर, एन-३, एन-४, ठाकरेनगर, जयभवानीनगर या अति जोखमीच्या भागांमध्येही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रभाग ‘ब’ची डॉ. संध्या टाकळीकर तर ‘ ई’ प्रभागाची डॉ. वंदना तिखे यांच्यावर जबाबदारी आहे. आरोग्य अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी खाजगी डॉक्टर्सची बैठक घेतली. यावेळी आयएमएचे डॉ. लाठी, डॉ. राऊळ, डॉ. गणेश कुलकर्णी, डॉ. वर्षा आपटे, डॉ. कस्तुरे, डॉ. शिंदे, डॉ. आनंद निकाळजे, डॉ. श्याम खंडेलवाल, डॉ. गुळवे, डॉ. संतोष ढोके, डॉ. धर्माधिकारी, डॉ.आसने, डॉ.मालू आदींची उपस्थिती होती.

Web Title: Combing operation again for dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.