शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांना राष्ट्रगीताचे फलक लावण्याचा विसर

By admin | Updated: July 24, 2014 00:38 IST

औरंगाबाद : महाविद्यालयांच्या आवारात मराठी आणि हिंदी भाषेत जन गण मन हे राष्ट्रगीत फलकावर लावावे, असे आदेश २००४ मध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांना दिलेले होते

औरंगाबाद : महाविद्यालयांच्या आवारात मराठी आणि हिंदी भाषेत जन गण मन हे राष्ट्रगीत फलकावर लावावे, असे आदेश २००४ मध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांना दिलेले होते. आजही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १२ जून २०१४ रोजी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांत रोज राष्ट्रगीत व्हावे, असा आदेश दिला होता. तो उच्चशिक्षण विभाग आणि विद्यापीठाने महिन्यानंतर महाविद्यालयांना न दिल्याचे ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. उच्च शिक्षण उपसंचालक विभागांतर्गत ११३ अनुदानित आणि २५२ विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. शहरातील एकाही महाविद्यालयात १७ फेब्रुवारी २००४ रोजी दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रगीत दोन्ही भाषेत फलकावर लावलेले नाही. विशेष म्हणजे बहुतांश संस्थांना या आदेशाची काही माहितीच नाही. प्राचार्यांना आम्ही निवेदन देणार आहोतमहाविद्यालयांनी राष्ट्रगीताचे फलक लावून रोज राष्ट्रगीताचे समूहगान व्हावे. शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. दहा दिवसांत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन करू.- संदीप कुलकर्णी, जिल्हा सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कारवाई व्हावीप्रांगणात मराठी आणि हिंदी भाषेत जन गण मन हे राष्ट्रगीत फलकावर लावणे आणि महाविद्यालयात रोज राष्ट्रगीताचे समूहगान करण्याच्या आदेशाकडे अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे. आदेश अमलात न आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. - सचिन निकम, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेनाफलक लावण्याचे आदेश दिले जातीलशासनाच्या आदेशाप्रमाणे महाविद्यालयांना राष्ट्रगीताचे फलक लावण्याचे आदेश लवकर देण्यात येतील.डी. आर. माने, कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी संचालकांशी चर्चा करून सर्व महाविद्यालयांना फलक लावण्याचे आदेश दिले जातील.डॉ. महम्मद फय्याज, उच्च शिक्षण सहसंचालक