जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी

By | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:46+5:302020-12-02T04:11:46+5:30

औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी किलेअर्क परिसरातील शासकीय महाविद्यालयात मंगळवारी दुपारी १२ वाजता औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ ...

Collector Sunil Chavan | जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी

औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी किलेअर्क परिसरातील शासकीय महाविद्यालयात मंगळवारी दुपारी १२ वाजता औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर चव्हाण म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील २०६ मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सर्व मतदान केंद्रांवर खबरदारी घेण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी मतदारांना केले.

Web Title: Collector Sunil Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.