शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

लातूर : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत लातूर जिल्ह्यातील ७५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

लातूर : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत लातूर जिल्ह्यातील ७५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेकडे हे सामुहिक राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. संघटनेनेच राजीनामे शासनाकडे पाठवावेत, असेही या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे तास इतर राज्याप्रमाणे निश्चित करावे, केंद्राप्रमाणे उच्च वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, एनपीए ऐच्छिक असावा, समायोजनेचे प्रश्न मार्गी लावावेत, सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यात यावे, आदी मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासन गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील ७५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संघटनेकडे सामूहिक राजीनामे दिले आहेत. राजीनामा दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने डॉ. सगिरा पठाण, डॉ. सचिन बालकुंदे, डॉ. राम पवार, डॉ. संतोष हिंदोळे, डॉ. ज्ञानेश्वर कदम, डॉ. खुळे, डॉ. राहुल आणेराव, डॉ. परमेश्वर हिरास, डॉ.एस.के. शिंदे, डॉ.आर.आर. शेख, डॉ. शशिकांत डांगे, डॉ.पी.एस. कापसे, डॉ. उज्ज्वला साळुंके, डॉ. श्रीनिवास कदम, डॉ. मुशीर शेख, डॉ. नारायण देशमुख, डॉ. तांदळे, डॉ. बाळासाहेब बायस, डॉ. धीरज देशमुख, डॉ. संजय पवार आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, जि.प.चे सीईओ, जिल्हा आरोग्याधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सोमवारी सादर केले. यावेळी डॉ. सगिरा पठाण, डॉ. राम पवार, डॉ. सचिन बालकुंदे उपस्थित होते.