औरंगाबादकर कुडकुडले, पारा १२.८ अंशांवर; मोसमातील नीचांकी तापमान नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 16:20 IST2021-11-11T16:20:01+5:302021-11-11T16:20:47+5:30
बुधवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी म्हणजे १२.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद

औरंगाबादकर कुडकुडले, पारा १२.८ अंशांवर; मोसमातील नीचांकी तापमान नोंद
औरंगाबाद : शहरात थंडीचा कडाका वाढला असून, बुधवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी म्हणजे १२.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली. तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहरात २९ ऑक्टोबर रोजी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे शहरात गारवा वाढला होता, परंतु त्यानंतर किमान तापमानात वाढ होत गेली आणि थंडी गायब झाली. परंतु गेल्या चार दिवसांत किमान तापमानात झपाट्याने घसरण झाली. त्यामुळे पुन्हा थंडीने शहराला कवेत घेतले. शहरात सकाळी सायंकाळी गारवा वाढला. गतवर्षी ११ नोव्हेंबर २०२० रोजी शहरात १२.० अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले होते. थंडी वाढल्याने ऊबदार कपडे परिधान करूनच नागरिक सकाळी आणि सायंकाळनंतर बाहेर पडण्यास प्राधान्य देत आहे. त्याबरोबरच ऊबदार कपडे खरेदीसाठीही नागरिकांची पावले बाजारपेठेकडे वळत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांचीही संख्या वाढली आहे.
असे घसरले तापमान
तारीख- तापमान
६ नोव्हेंबर - १९.८
७ नोव्हेंबर-१९.१
८ नोव्हेंबर-१४.४
९ नोव्हेंबर-१३.६
१० नोव्हेंबर-१२.८