मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे ४ वाजता दिल्लीहून औरंगाबादेत; दौरा पूर्ण करणार

By संतोष हिरेमठ | Updated: July 31, 2022 09:18 IST2022-07-31T09:16:51+5:302022-07-31T09:18:50+5:30

दिल्लीहून विशेष विमानाने औरंगाबादला येताना त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

cm eknath shinde came at 4 am from Delhi to Aurangabad will complete the tour | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे ४ वाजता दिल्लीहून औरंगाबादेत; दौरा पूर्ण करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे ४ वाजता दिल्लीहून औरंगाबादेत; दौरा पूर्ण करणार

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : दिल्लीवरून पहाटे ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष विमानाने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

औरंगाबाद दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी औरंगाबादेत मुक्कामी येणार होते. मात्र अचानक या दौऱ्यात बदल झाला आणि ते शनिवारी रात्री औरंगाबादहुन दिल्लीला गेले. रात्री उशिरा २ वाजेपर्यंत ते पुन्हा औरंगाबादमध्ये परत येतील , असे नियोजन विमानतळाला प्राप्त झाले होते. पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांचे विमान दिल्लीहून औरंगाबादेत दाखल झाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शहरात विविध कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, दिल्लीहुन विशेष विमानाने औरंगाबादला येताना त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे विमान औरंगाबादहुन मुंबईला गेले.

Web Title: cm eknath shinde came at 4 am from Delhi to Aurangabad will complete the tour