ढगफुटी सदृश्य पावसाने ५० घरे वाहून गेली; ३०० कुटुंबाचे संसार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 19:44 IST2021-09-28T19:42:27+5:302021-09-28T19:44:11+5:30
Rain in Aurangabad रात्रीच्या पुरात घरे वाहून गेलेल्या कुटुंबियांना ग्रामस्थांनी अथक परिश्रम करून पुराच्या बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले.

ढगफुटी सदृश्य पावसाने ५० घरे वाहून गेली; ३०० कुटुंबाचे संसार रस्त्यावर
सोयगाव ( औरंगाबाद ) : सोयगाव तालुक्याला सोमवारी रात्री झालेल्या आठ तासांच्या संततधार ढगफुटीच्या पावसामुळे रात्री चार वाजेनंतर निंबायती गावालगत असलेल्या नाल्याला आलेल्या महापुरात पन्नास घरे पाण्यात वाहून गेल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली.
रात्रीच्या पुरात घरे वाहून गेलेल्या कुटुंबियांना ग्रामस्थांनी अथक परिश्रम करून पुराच्या बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रमेश जसवंत यांनी तातडीने निंबायतीला महसूलचे मदत पथक पाठविले.परंतु नाल्याच्या पुरात हे पथकही अडकल्याने दुपारी उशिरा या घटनेची पथकांकडून पाहणी करण्यात आली होती.
वानटाकळीत पुराचे पाणी घुसले,शेतकऱ्यांनी चिंचेच्या झाडावर रात्र काढली
ग्रामस्थ सुरक्षितस्थळी
अतिवृष्टीच्या तडाख्यात निंबायती गावात मोठा फटका बसला आहे. याबाबत पाहणी केली असून तातडीने नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून अहवाल पाठविण्याच्या सूचना पथकाला दिलेल्या आहेत. बेघर झालेली नागरिक सुरक्षितस्थळी आहेत. संबंधित ग्रामसेवकाला या नागरिकांची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- रमेश जसवंत, तहसीलदार सोयगाव