अवकाळी मुक्कामी

By Admin | Updated: April 13, 2015 00:49 IST2015-04-13T00:33:11+5:302015-04-13T00:49:58+5:30

बीड : जिल्ह्यात रविवारी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढले. यामध्ये उरल्यासुरल्या फळबागा भुईसपाट झाल्या

Closing pitch | अवकाळी मुक्कामी

अवकाळी मुक्कामी


बीड : जिल्ह्यात रविवारी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढले. यामध्ये उरल्यासुरल्या फळबागा भुईसपाट झाल्या. अवकाळी पाऊस मुक्कामी असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
गुरूवारपासून अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. रविवारी चौथ्या दिवशीही केज, अंबाजोगाई, धारूर, परळी या तालुक्यांना गारपिटीचा तडाखा बसला. बीड शहरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या. चार वाजता केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. गारांच्या पावसाने बनसारोळा, बोरीसावरगावात भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. धारूरमध्ये कोठेवाडी, सोनीमोहा परिसरात घरावरील पत्रे उडाले. त्यामुळे काहींना बेघर व्हावे लागले. झाडे उन्मळून पडली. भाजीपाल्याच्या शेतात उभारलेले तारेचे कुंपण जमीनदोस्त झाले. गारांचा मारा एवढा असह्य होता की, एका बैलालाही प्राण गमवावे लागले. गेवराईतही धुवाँधार पाऊस झाला. जातेगाव, तलवाडा, उमापूर, कोळगाव, पाडळसिंगी या भागात पावसाने दाणादाण उडविली.
धारूर, परळीत नद्या धो-धो
धारूर, परळी तालुक्यातील नद्या धो-धो वाहिल्या. परळी तालुक्यातील भगवती नदीला तर पूर आला होता. छोट्या पुलावरून पाणी वाहिल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती. धारूरमध्ये नद्या, नाले तुडूंब वाहिले. डाळिंब, केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. या भागात मोठ्या प्रमाणावर आमराई आहे. गारपिटीने आंब्याचीही हानी झाली. (प्रतिनिधींकडून )
पाऊस, वादळी वारे व गारपीट यामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील क्षण अनुभवयास येत आहेत.
४बीड जिल्ह्यात रविवारपर्यंतच अवकाळी पावसाचा धोका होता, असा शास्त्रज्ञाचा दावा आहे.
४बीडमध्ये रविवारनंतर गारपीट होण्याची शक्यता कमी असल्याचे परभणी कृषी विद्यापीठातील मुख्य प्रकल्प समन्वयक प्रा. प्रल्हाद जायभाये यांनी सांगितले.

Web Title: Closing pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.