शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
4
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
5
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
6
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
7
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
8
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
9
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
10
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
11
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
12
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
13
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
14
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
15
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
16
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
17
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
18
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
19
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
20
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद

By admin | Updated: June 10, 2014 00:53 IST

लातूर : महापुरुषांच्या फेबसबुकवरील विटंबनाप्रकरणी जिल्ह्यात निलंगा, उदगीर व किल्लारीत बाजारपेठ ठेऊन ठिकठिकाणी सदरील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला़

लातूर : महापुरुषांच्या फेबसबुकवरील विटंबनाप्रकरणी जिल्ह्यात निलंगा, उदगीर व किल्लारीत बाजारपेठ ठेऊन ठिकठिकाणी सदरील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला़
निलंगा : महापुरुषांच्या प्रतिमेची फेसबुकवर विटंबना केल्याप्रकरणी विविध संघटनांच्या वतीने निलंगा बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली़ तसेच रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अंकुश ढेरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ यामध्ये महापुरुषाची विटंबना करणाऱ्या माथेफिरूस फाशीची शिक्षा द्यावी, फेसबुक वापरावरच बंदी घालावी, अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करावा, आदी मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले़
निवेदनावर मनसेचे डॉ़ नरसिंह भिकाणे, रामलिंग पटसाळगे, मेघराज जेवळीकर, दिगंबर सूर्यवंशी, अमोल कांबळे, धम्मानंद कांबळे, भरत सूर्यवंशी, संदीप कांबळे, लहू ढेरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़
उदगीर : रिपाइं तालुका शाखेच्या वतीने महापुरुषांच्या फेसबुकवरील विटंबनेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली़ यावेळी अ‍ॅड़ प्रफुल्लकुमार उदगीरकर, सुशीलकुमार शिंदे, राहुल कांबळे, अमोल श्रृंगारे, अतुल घोडके, नितीन गायकवाड, अविनाश गायकवाड, प्रदीप महापुरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़
(प्रतिनिधी)
किल्लारीतही बंद़़़
महापुरुांच्या फेसबुकवरील विटंबनेच्या निषेधार्थ औसा तालुक्यातील किल्लारी येथे भिम सेनेतर्फे किल्लारी मार्केट बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला़ यावेळी सुनील कांबळे, बिभिषण कांबळे, राहूल कांबळे, गणेश कांबळे, प्रदीप कांबळे, बाबासाहेब कांबळे, सुभाष गायकवाड, दयानंद गायकवाड, बाबासाहेब सितापूरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी परिश्रम घेतले़ त्यामुळे किरकोळ घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही़
‘त्या’ प्रकरणाचा लातुरात निषेध
लातूर : महापुरूषांची छायाचित्रे फेसबुक व सोशल मीडियावर अपलोड करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे़ महापुरूषांची बदनामी करण्याचा हा प्रकार घृणास्पद असून याचा जाहीर निषेध सामाजिक संघटनांकडून करण्यात आला आहे़ सामाजिक सलोखा कायम राखून गुन्हेगारास कडक शासन करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे़
जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या वतीने सामाजिक संघटनांची एकत्रित बैठक घेऊन याप्रकरणाचा निषेध करण्यात आला़ सामाजिक सलोखा राखण्यात लातूरची आदर्श परंपरा आहे़ याला तडा जाऊ नये़ राज्यात धार्मिक स्थळांचे पावित्र्य जाणीवपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ महापुरूषांची जाणीवपूर्वक बदनामी करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ पुणे येथे एका तरूणांचा नाहक बळी गेला आहे़ जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सर्वांनी हाणून पाडला पाहिजे़
गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, परंतु जातीच्या नावाने तेढ करण्याचा प्रयत्न थांबवावा, अशी मागणी करण्यात आली़ यावेळी जमीयत उलेमा हिंदचे जिल्हाध्यक्ष हाफीज अब्दुल जब्बार, सचिव मौलाना ईस्माईल कास्मी, इक्रम शेख, मराठा सेवा संघाचे विजयकुमार औंढे, भारत मुक्ती मोर्चाचे मारूती माने, प्रा़ भिसे, बामसेफचे चंद्रकांत वानखेडे, मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष कलीम पटेल, एमआयएमचे बरकत काझी, ओ़बी़सी़चे जिल्हाध्यक्ष अफजल कुरेशी, साबेर काजी, डॉ़ नवीद खान, पठाण उपस्थित होते़
(प्रतिनिधी)