पाण्यावरून हाणामारी
By Admin | Updated: May 16, 2016 23:32 IST2016-05-16T23:29:10+5:302016-05-16T23:32:46+5:30
गेवराई : तालुक्यातील रेवकी येथे नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून रविवारी हाणामारी झाली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद झाला.

पाण्यावरून हाणामारी
गेवराई : तालुक्यातील रेवकी येथे नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून रविवारी हाणामारी झाली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद झाला.
रामभाऊ चोरमले हे पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळावर गेले होते. इतर तिघेही तेथे पाणी भरण्यासाठी आले होते. यावेळी बारीवरून बाचाबाची झाली. त्यानंतर एकनाथ चोरमले, बदाम चोरमले, सुदाम चोरमले यांनी रामभाऊंना बेदम मारहाण केली. रिक्षाचा टप फाडून नुकसानही केले, अशी फिर्याद रामभाऊ चोरमले यांनी दिली. तपास पोहेकाँ एस. व्ही. घाणे हे करीत आहेत. (वार्ताहर)