ज्वारी काढण्यावरून दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: March 2, 2015 00:52 IST2015-03-02T00:48:49+5:302015-03-02T00:52:09+5:30
नळदुर्ग : कुळाच्या शेतातील ज्वारी काढण्यावरून दोन गटांत तलवार, कोयत्याने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजता तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा नळ येथे घडली.

ज्वारी काढण्यावरून दोन गटांत हाणामारी
नळदुर्ग : कुळाच्या शेतातील ज्वारी काढण्यावरून दोन गटांत तलवार, कोयत्याने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजता तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा नळ येथे घडली. या घटनेत नऊजण जखमी झाले असून, परस्पर तक्रारीवरून २५ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
श्रीशैल गणपती बिराजदार यांनी नळदुर्ग पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, देवसिंगा (नळ) येथील सर्वे नंबर ६३ मधील जमिनीवर त्यांचे कूळ असून, सदर प्रकरणी न्यायालयात दावा चालू आहे. असे असताना सैफन शेख, अजरोद्दीन शेख, अब्दुल शेख (सर्व रा. देवसिंगा नळ) तसेच हसन पठाण, चाँद पठाण, इरलाल पठाण, महंमद पठाण (सर्व रा. धोत्री, ता. द. सोलापूर), इब्राहिम जमादार (रा. आलूर), अब्बासअली शेख (रा. बेंबळी) यांनी संगनमताने फिर्यादी व पंडित बिराजदार, भीमराव बिराजदार व धोंडीराम बिराजदार यांना काठ्या व दगडाने मारहाण केली. यावरून गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, हसन नादर पठाण (रा. धोत्री) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सदर जमिनीवर मागच्या अनेक वर्षापासून माझा ताबा असून, न्यायालयाने त्याच्यासारखा निकाल दिला आहे. शिवाय सातबारावर माझेच नाव आहे. कूळसंबंधी तक्रार चालू असली तरी गणपत बिराजदार, विनोद बिराजदार, आप्पासाहेब जेऊरे, युवराज बिराजदार, आनंदप्पा बिराजदार, सोमनाथ बिराजदार, विकास बिराजदार, श्रीशैल बिराजदार, धर्मराज बिराजदार, धोंडप्पा बिराजदार, संदेश बिराजदार, पंडित बिराजदार, भीमराव बिराजदार, संगप्पा बिराजदार (रा. सर्व देवसिंगा नळ) यांनी संगनमताने तलवार, कोयता, कुऱ्हाडी, दगड व काठ्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. यात हाजमुद्दीन पठाण याच्या डोक्यावर व कपाळावर तलवारीचे वार झाले असून, महंमद पठाण, आसीफ पठाण, अबीदा पठाण, बंदेअली शेख जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तपास पोउपनि पठाण व दिलीप सरवदे करीत आहेत. घटनास्थळास सपोनि एम. वाय. डांगे, उपविभागीय पोलीस अधिकारी विधाते यांनी भेट दिली असून, रविवारी सायंकाळपर्यंत धरपकड चालूच होती. (वार्ताहर)