विजेच्या समस्येने नागरिक हैराण
By Admin | Updated: June 11, 2014 00:21 IST2014-06-10T23:59:34+5:302014-06-11T00:21:05+5:30
रामपुरी बु़ : मानवत तालुक्यातील रामपुरी बु़ येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील गलथान कारभारामुळे मागील सात दिवसांपासून गावातील वीजपुरवठा खंडित आहे़
विजेच्या समस्येने नागरिक हैराण
रामपुरी बु़ : मानवत तालुक्यातील रामपुरी बु़ येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील गलथान कारभारामुळे मागील सात दिवसांपासून गावातील वीजपुरवठा खंडित आहे़ या ठिकाणी उपअभियंता आणि शाखा अभियंता नसल्याने तर कोणाकडे जावे, अशी समस्या निर्माण झाली आहे़
३ जून रोजी रामपुरी आणि परिसरात अवकाळी पाऊस झाला़ अवकाळी पावसाने या भागात विजेचे पोल वाकून गेले़ काही ठिकाणी तारा तुटल्या़ यामुळे येथील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे़ पर्यायाने रबी हंगामाच्या प्रारंभी या भागात पाणी उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना कापूस लागवड करण्यासाठी पाणी देता येत नाही़ रामपुरी बु़ येथे ३३ केव्ही उपकेंद्र असून या उपकेंद्रात जवळपास सोळा गावे येतात़ या उपकेंद्रासाठी कार्यरत असणारे शाखा अभियंता आणि सहाय्यक अभियंता या कार्यालयाकडे कधी फिरकत नाहीत़ यामुळे विजेची समस्या सुटत नाही़ नागरिकांनी अनेकवेळा वीज मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करूनही या कार्यालयातील समस्या मात्र सुटत नाहीत़ रात्री-बेरात्री वीज गायब झाली तर पुरवठा दुरुस्त करण्यासाठीही कर्मचारी उपलब्ध होत नाहीत़ या प्रकाराला गावातील नागरिक पूर्णत: वैतागले आहेत़ याकडे वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी श्रीकांत यादव, सुरेश यादव यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे़ (वार्ताहर)