शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:34 IST

आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देश, राज्य, जिल्ह्यातील विकासांच्या मुद्याऐवजी महापालिका हद्दीतील नागरी सुविधांवर जास्तीचा भर देऊन विरोधकांनी प्रचार केल्यामुळे शिवसेना-भाजपचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा फटका बसला. शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठ्याचा मुद्दा विरोधकांनी प्रचारात ऐरणीवर ठेवला होता. परिणामी मोठा पराभव होऊनही मनपातील सत्ताधारी युतीला जाग येत नाही. आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

महिन्यातून फक्त चार दिवस काही वसाहतींना पाणीपुरवठा होत असल्याची ओरड होत आहे. पाणीपट्टी वर्षभराची आणि पाणीपुरवठा आठ दिवसांतून एकदा, असा प्रकार पालिकेकडून होत असल्यामुळे नागरिक संतापले आहेत. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात पालिका प्रशासन कमी पडले आहे.

सिडको-हडकोत पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सात ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. दोन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणावरील पंपगृहाच्या विद्युत तारांवर वीज पडल्यामुळे काही तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने तेथे दुरुस्ती केली. मात्र, शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले.

जायकवाडी धरणातून १५५ ऐवजी १३५ एमएलडी पाणी उपसा सुरू होता. गळत्यांवर मात करीत ११५ ते १२० एमएलडीच पाणी शहराला येते. दोन महिन्यांत २० एमएलडी पाणी कमी झाल्यामुळे अनेक भागांत उशिरा पाणीपुरवठा होतो आहे.

गुंठेवारी वसाहतींनी काय करावेशहरातील ११९ पैकी ५० टक्के गुंठेवारी वसाहतींमध्ये नळ पाणीपुरवठा योजना नाही. त्या वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. नळांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे टँकरच्या फेऱ्यादेखील लांबणीवर पडत आहेत. गुंठेवारी भागातील नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड धावपळ होत आहे. ड्रमभर पाण्यासाठी आठ दिवस वाट पाहण्यापलीकडे या नागरिकांच्या हाती काहीही राहिलेले नाही.

पालिका अभियंत्यांचा दावा असा-जायकवाडी धरणातून पंपगृहांसाठी पाणी उपसा करण्याकरिता आपत्कालीन ६ तरंगते पंप बसविण्यात आले. त्यापैकी ५ पंप वारंवार ट्रिप होत असल्याने फारोळ्यात जलशुद्धीकरण केंद्रावर परिणाम होत असे. मनपा अभियंत्यांनी पाणीपुरवठ्यामधील तांत्रिक दोष शोधून दुरुस्ती केल्यामुळे पंप ट्रिपिंग होणे बंद झाले आहे. दरम्यान पाणीपुरवठा सुरुळीत झाल्याचा दावा कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात