शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

शहरात मोहर्रमची अनोखी परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 19:09 IST

उर्दू कॅलेंडरनुसार मोहर्रम म्हटले की, सुन्नी मुस्लिम बांधवांसाठी एक प्रकारे पर्वणीच ठरत असे.

ठळक मुद्दे शहरात विविध ठिकाणी १११ सवाऱ्या  रोट, चोंगे, गेले काळाच्या पडद्याआड

औरंगाबाद : उर्दू कॅलेंडरनुसार मोहर्रम म्हटले की, सुन्नी मुस्लिम बांधवांसाठी एक प्रकारे पर्वणीच ठरत असे. मोहर्रमच्या दहा दिवसांमध्ये रोट, चोंगे, सरबतची मेजवानी असायची. हळूहळू काळ बदलू लागला. प्रत्येक घरातील मोहर्रमची लगबगही थंडावली. ७०० वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने सवाऱ्या बसविण्यात येत होत्या, तशाच सवाऱ्या आजही बसविण्यात येतात. यात फरक पडला फक्त संख्येचा. पूर्वी शहरात ३८६ सवाऱ्या बसत होत्या. आज त्यांची संख्या १११ वर आली आहे. सवाऱ्यांना मानणारा वर्ग कमी-कमी होऊ लागला आहे.

तैमुरलंग भारतावर आक्रमण करण्यासाठी इराणमधून आला तेव्हापासून सवाऱ्या बसविण्याची प्रथा आहे. मोगल कालखंडातही सवाऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. जगभरात इस्लामचा प्रचार आणि प्रसार फारसा झालेला नव्हता. मागील काही वर्षांमध्ये तबलीग जमातने केलेल्या जनजागृतीमुळे सवाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. औरंगाबाद शहरातही मोहर्रम ४०० वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. माजी महापौर तथा अलम बरदार कमिटीचे अध्यक्ष रशीद मामू यांनी सांगितले की, जगभरात कुठेच शिया आणि सुन्नी मुस्लिम मोहर्रमच्या १० तारखेला एकत्र येत नाहीत.

औरंगाबाद शहर याला एकमेव अपवाद आहे. दोन्ही समाज एकमेकांचा आदर करीत आपले व्यासपीठ उपलब्ध करून देतात. शिया बांधव मातम म्हणजेच इमाम हुसैन यांच्या आठवणीत दु:ख व्यक्त करतात. सुन्नी मुस्लिम सवाऱ्यांच्या माध्यमाने आनंद व्यक्त करतात. दोन्ही समाजांना एकात्मतेच्या दोरीत बांधून ठेवण्याचे काम अलम बरदार कमिटीने केले. मागील ४१ वर्षांमध्ये दोन समाजांत विविध समाजाचे सण एकत्रित आले तरीही समाजामध्ये किंचितही वाद झाला नाही, असे रशीदमामू म्हणाले.

ताजिया पद्धत लुप्तमोहर्रमच्या ७ तारखेला सातारा, देवळाई, हर्सूल, सावंगी आदी भागांतून ताजिया शहरात येत असत. हळूहळू ही पद्धत बंद झाली. मोहर्रमला बुढीलेन, लोटाकारंजा, चेलीपुरा आदी भागांत मजमा भरविण्यात येत होता. ही पद्धतही कालांतराने बंद पडली. आता अकराव्या दिवशी बेगमपुरा, जिन्सी येथील पंजा येतात.

बड़े चाँदसाहबभडकलगेट येथे बड़े चाँदसाहब यांची सवारी बसविण्यात येते. चेलीपुऱ्यात अनेक वर्षांपासून छोटे चाँदसाहब यांची सवारी बसविण्यात येते. काही सवाऱ्या घरासमोरही येतात. नवाबपुरा येथील हिरे कालम, इमाम-ए-खातीम, १२ इमाम, बेगमपुऱ्यातील संदलसाहब, बुढीलेन येथील कवडीपीर, अशी विविध नावे सवाऱ्यांना आहेत. महिला चांदीचे पाळणे बांधून ‘मन्नत’ मागत असतात. आमच्या घरात पाळणा हलला, तर मुलाला ‘शेर’ बनवून सवारीसाठी आणण्यात येईल, अशीही मन्नत असते, असे रशीदमामू यांनी सांगितले. गुरुवार, दि.२० सप्टेंबर रोजी सिटीचौक येथे दरवर्षीप्रमाणे मजमा भरविण्यात येणार आहे. 

खाद्य संस्कृती लुप्तमोहर्रममध्ये बेकरीत भाजून केलेल्या रोटची भयंकर क्रेझ होती. मागील २० ते २५ वर्षांमध्ये रोट तयार करणेच बंद झाले आहे. याशिवाय प्रत्येक घरी गोड चोंगे तयार करण्यात येत असत. चविष्ट सरबत तयार करण्यात येत होते. हळूहळू ही सर्व खाद्य संस्कृतीच आता लुप्त पावली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकMuslimमुस्लीमmuharramमुहर्रम