शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्वच्छता ठप्प

By admin | Updated: July 21, 2014 00:27 IST

परभणी: शहर महानगरपालिकेतील कर्मचारी चार दिवसांपासून संपावर गेल्याने शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत.

परभणी: शहर महानगरपालिकेतील कर्मचारी चार दिवसांपासून संपावर गेल्याने शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत. दरम्यान, प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.थकलेला पगारासह इतर अनेक मागण्यांसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यावेळच्या संपात मनपातील सर्वच कर्मचारी, अधिकारी सहभागी झाल्यामुळे कामे ठप्प झाली आहेत. स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा ही कामे अत्यावश्यक सेवेत मोडतात. परंतु कर्मचारी संपात असल्याने ही कामे ठप्प झाली आहेत. शहरात सकाळच्या वेळी होणारी स्वच्छताही होत नसल्याने घाणीत वाढ झाली आहे.दरम्यान, के़ के़ आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली़ त्यात २१ जुलै रोजी परभणी शहर महानगरपालिकेतील कर्मचारी शनिवार बाजार येथून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील़ तर नगरपालिकेतील कर्मचारी तहसीलवर मोर्चा काढतील़ २२ जुलै रोजी शहर मनपातील कर्मचारी खासदारांच्या कार्यालयासमोर आणि नगरपालिकेचे कर्मचारी त्या त्या मतदारसंघाच्या आमदारांच्या कार्यालयासमोर निर्दशने करतील़ २३ जुलै रोजी रास्ता रोको व जेलभरो आंदोलन, २४ रोजी शासनाचा निषेध म्हणून मुंडन आंदोलन, २५ जुलै रोजी बोंब मारून व नंतर तोंडाला पट्टी लावून मुक आंदोलन करण्यात येईल़ शासनाने मागण्या मान्य न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला़ मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनावर आनंद मोरे, मुक्तशीद खान, अनुसयाबाई जोगदंड, के़ के़ भारसाखळे, अशोक शिंदे, एस़ एस़ पालकर, परमेश्वर पारधे, नजम खान, सुनिता अहिरे, अय्युब खान, आऱटी़ मानकर, डी़ व्ही़ तळेकर, राम कांबळे, रमेश बारहाते, नागनाथ पोटुळे, नागनाथ साळवे, उत्तम कांबळे आदींची नावे आहेत़ (प्रतिनिधी)कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज मनपातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मनपातील कर्मचाऱ्यांचा चार-पाच महिन्यांपासून पगार थकलेला आहे. प्रशासनाने अजूनपर्यंत कुठलाही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.शासन व प्रशासनाने या प्रश्नावर सकारात्मक पावले उचलून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. सध्या तरी कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.