आंबा महोत्सवास नागरिकांचा प्रतिसाद
By Admin | Updated: May 15, 2014 00:16 IST2014-05-15T00:15:07+5:302014-05-15T00:16:12+5:30
परभणी : छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्र, शिवाजीनगर येथे १४ मे रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
आंबा महोत्सवास नागरिकांचा प्रतिसाद
आंबा महोत्सवास नागरिकांचा प्रतिसाद परभणी : छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्र, शिवाजीनगर येथे १४ मे रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर, , माज्ी खा.शेषराव देशमुख, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आर. डी. देशमुख, आ.बंडू जाधव, आयोजक डॉ. राहुल पाटील, प्रा. मोरे, प्रा. शिंदे, शंकरबापु महाराज, सखुबाई लटपटे, बालाजी मोहिते, भास्कर लंगोटे, पंढरीनाथ घुले, विष्णू मुरकुटे, छगनराव मोरे, बाळासाहेब राके, संतोष गायकवाड, संजय डहाळे, रामा आवरगंड, नितीन देशमुख, अजित वरपूडकर, माणिक सूर्यवंशी, संदीप राठोड, प्रशांत शिंदे, सोनाली सूर्यवंशी, विलास कौसडीकर, डॉ.श्याम जेथलिया, प्रा. गिरी, संदीप झाडे, बालासाहेब ढोले, विशाल बुधवंत, अंकुश मस्के आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पांचाळ यांनी केले. या महोत्सवात विविध जातीचे आंबे ठेवण्यात आले होते. हे आंबे खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. (प्रतिनिधी)