शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीरचा दर २०० रुपये किलोवर

By admin | Updated: July 13, 2014 00:25 IST

नांदेड : जुलैचा अर्धा महिना संपत आला तरी अद्याप पाऊस झाला नसल्याचा परिणाम भाजीबाजारावर जाणवू लागला असून कोथिंबीरचे दर तब्बल २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत.

नांदेड : जुलैचा अर्धा महिना संपत आला तरी अद्याप पाऊस झाला नसल्याचा परिणाम भाजीबाजारावर जाणवू लागला असून कोथिंबीरचे दर तब्बल २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. यामुळे गृहिणीचे मात्र महिन्याचे बजेट कोलमडले आहे.नांदेड शहरातील विविध भाजी बाजारात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. मृग नक्षत्र सुरु होऊन सव्वा महिन्याचा कालावधी होत असताना पाऊस झाला नाही, याचा परिणाम भूगर्भातील पाणीपातळीत घट होत असल्याने उत्पन्न कमी होऊन बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. मागणी जास्त आणि आवक कमी यामुळे भाजीपाल्यांसह पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या असलेले भाजीपाल्याचे दर असे- कोथिंबीर २०० रु. किलो, बटाटे ४० रु.किलो, टोमॅटो ४० रु.किलो, हिरवी मिरची ८० रु.किलो, वांगी ६० रु.किलो, भेंडी ६० रु. शेवगा ६० रु.किलो, पालक १० रु. पाव, चुका १० रु.पाव, कोबी ८० रु.किलो याप्रमाणे दर आहेत.एप्रिल- मे महिन्यात बाजारात भाजीपाल्याची आवक जास्त असल्याने दरही आटोक्यात होते. मे मध्ये तर टोमॅटोचे दर २ रुपये किलोवर ेयेवून ठेपले होते, शेतकऱ्यांना तोडणी करुन विक्रीसाठी आणण्याचा खर्चही निघत नव्हता. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी बंद करुन टोमॅटोच्या शेतीची नांगरटी करुन टाकली होती. मात्र आजघडीला टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने ६०० ते ७०० रुपये कॅरेट (प्रति २० किलो) याप्रमाणे दर मिळत आहेत. उपलब्ध पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली नाही. याचा परिणाम होवून सर्वच भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. (प्रतिनिधी)