सिडको पोलिसांनी मोबाईल चोर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 19:20 IST2019-01-25T19:19:56+5:302019-01-25T19:20:36+5:30
मोबाईल चोरास सिडको पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या ताब्यातून दोन मोबाईल जप्त केले आहेत.

सिडको पोलिसांनी मोबाईल चोर पकडला
औरंगाबाद : मोबाईल चोरास सिडको पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या ताब्यातून दोन मोबाईल जप्त केले आहेत.
चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी हडको येथे एक जण येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिल्याने सिडको पोलिसांच्या गस्ती पथकातील कर्मचाºयांनी लक्ष ठेवले. दरम्यान, एक युवक फिरताना मिळून आला. त्याला विचारले असता त्याने शेख उमेर शेख आरेफ (२८, रा. शरीफ कॉलनी), असे नाव सांगितले. त्याच्याकडील असलेल्या मोबाईलविषयी चौकशी केली असता तो मोबाईल चोरीचा असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.