टीडीआरच्या कक्षेत सिडको-हडको?

By Admin | Updated: December 18, 2014 00:42 IST2014-12-17T23:49:33+5:302014-12-18T00:42:12+5:30

औरंगाबाद : सिडको-हडको परिसराला टीडीआरच्या (ट्रान्स्फर डेव्हलपमेंट राईट, विकास हस्तांतरण अधिकार) कक्षेत आणण्याच्या हालचाली पालिकेच्या नगररचना विभागाने सुरू केल्याचे वृत्त आहे.

CIDCO-Hudco in TDR cell? | टीडीआरच्या कक्षेत सिडको-हडको?

टीडीआरच्या कक्षेत सिडको-हडको?

औरंगाबाद : सिडको-हडको परिसराला टीडीआरच्या (ट्रान्स्फर डेव्हलपमेंट राईट, विकास हस्तांतरण अधिकार) कक्षेत आणण्याच्या हालचाली पालिकेच्या नगररचना विभागाने सुरू केल्याचे वृत्त आहे. यासाठी नगररचना विभागाने संचालक नगररचना पुणे यांना पत्रव्यवहार केला आहे.
अंदाजे ३५ हजार मालमत्तांची मालकीच अजून सिडकोकडे आहे. मग मनपा त्या मालमत्तांना टीडीआरच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली का करीत आहे, असा प्रश्न आहे. हा सगळा प्रकार बिल्डरांसाठी सुरू आहे काय, शिवाय लीजहोल्डवरील मालमत्तांचा टीडीआर विकत कोण घेणार, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
२००६ साली सिडको-हडकोतील मालमत्तांच्या सेवासुविधांचे मनपाकडे अवघ्या १५ कोटी रुपयांमध्ये हस्तांतरण झाले. तेव्हापासून लीजहोल्ड टू फ्रीहोल्ड करण्याचा प्रस्ताव रखडलेला आहे.

Web Title: CIDCO-Hudco in TDR cell?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.