शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

सिडकोला आता मिळणार पाचव्या दिवशी पाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 4:41 PM

मनपाच्या नियोजनाचे यश

ठळक मुद्देपाण्यासाठी चार महिन्यांत किमान १०० पेक्षा अधिक आंदोलने झाली. शहरातील अनेक वॉर्डांना पाचव्या दिवशीसिडको-हडकोला आठव्या दिवशी पाणी मिळत असे

औरंगाबाद : सिडको-हडकोसह चिकलठाण्यापर्यंतच्या अनेक वॉर्डांना मागील काही महिन्यांपासून चक्क आठव्या, दहाव्या दिवशी पाणी देण्यात येत होते. या भागातील नागरिकांची प्रचंड ओरड लक्षात घेऊन मनपाचे शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री सिडको एन-५, एन-७ आणि चिकलठाणा येथील जलकुंभ अनेक वर्षांनंतर प्रथमच तुडुंब भरले. या चमत्कारामुळे सिडको-हडकोला आता पाचव्या दिवशी पाणी देणे सहज शक्य होणार आहे.

सिडको-हडको आणि जालना रोडवरील काही वॉर्डांना यंदा उन्हाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. पाण्यासाठी चार महिन्यांत किमान १०० पेक्षा अधिक आंदोलने झाली. पावसाळा सुरू झाला तरी या भागातील पाणी प्रश्न जशास तसा होता. अखेर राज्यमंत्री अतुल सावे यांनी या प्रकरणात लक्ष घातले. मनपा आयुक्तांची भेट घेऊन समान पाणी वाटपाची सूचना त्यांनी केली. शहरातील अनेक वॉर्डांना पाचव्या दिवशी पाणी तर सिडको-हडकोला आठव्या दिवशी पाणी का? असा प्रश्न सावे यांनी उपस्थित  केला होता. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दोन दिवसांत नियोजन करण्याचे आश्वासन दिले होते.

शहर अभियंता एस.डी. पानझडे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना आयुक्तांनी केली होती. मागील चार ते पाच दिवसांपासून पानझडे यांनी सूक्ष्म नियोजन केले. नक्षत्रवाडीहून एन-५ पर्यंत येणाऱ्या एक्स्प्रेस लाईनवर ठिकठिकाणी मोठे कनेक्शन देण्यात आले आहेत. शिवाजीनगर, पुंडलिकनगर, एसएफएस जलकुंभावरील अनेक वॉर्डांना तीन दिवसाआड पाणी देण्यात येत होते. तीन दिवसाआड पाणी मिळणाऱ्या वॉर्डांना आता चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारी मध्यरात्रीपासून करण्यात आली. त्यामुळे सिडको-हडकोतील तिन्ही जलकुंभ तुडुंब भरले. आता सिडको-हडकोला चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी देण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.टँकरच्या फक्त ७० फेऱ्या घटल्या शहर परिसरातील बोअर आटल्यामुळे टँंकरची मागणी वाढत होती. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे काही बोअरला पाणी आले असून, टँकरची मागणी घटत आहे. रोजच्या ७० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. ५१ टँकरद्वारे ५५० फेऱ्या आजही सुरू आहेत.

जायकवाडी धरणात काम सुरूचजायकवाडी धरणात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करताना बराच त्रास सहन करावा लागत आहे. मनपाने सोमवारपासून आपत्कालीन अ‍ॅप्रोच चॅनलच्या ठिकाणी खोदकाम सुरू केले. डाव्या कालव्यापर्यंत जास्तीत जास्त पाणी आणण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. हे काम तीन दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. सध्या एक पोकलेन, एक जेसीबी व दोन ट्रकच्या मदतीने काम सुरू आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणcidcoसिडको