औरंगाबाद : नाताळ आणि नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी औरंगाबादकरांची पावले विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे वळत आहेत. विविध ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे, विमान आणि बसचे बुकिंग नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर फुल झाली आहे. नाताळ सण, विकेन्ड आणि त्यानंतर सरत्या वर्षाला निरोप, असा तिहेरी योग जुळून आल्याने सुट्ट्यांचा आण पर्यटनाच्या ठिकाणी घेण्याकडे शहरवासीयांचा ओढा दिसून येत आहे. नाताळची सुटी म्हटली की, गोव्याला जायचे, असे समीकरण गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गोव्याला जाण्यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गोव्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने याठिकाणी जाण्यासाठी अन्य वाहतूक सुविधांचा आधार घ्यावा लागत आहे. गोव्याशिवाय केरळ, म्हैसूर, उटी, महाबळेश्वर, नैनिताल, दिल्ली, बंगळुरू ही ठिकाणे पर्यटनासाठी हॉट स्पॉट ठरत आहेत. सुट्ट्यांचा आनंद या ठिकाणांवर व्यतीत करण्यास औरंगाबादकरांनी अग्रक्रमदिला आहे.रेल्वेगाड्या फुलसचखंड एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, औरंगाबाद-रेनीगुंटा साप्ताहिक एक्स्प्रेस, ओखा-रामेश्वरम, हैदराबाद-अजमेर या रेल्वेगाड्यांच्या आगामी काही दिवसांमधील बुकिंग फुल झाली आहे. यामध्ये सचखंड एक्सप्रेसची वेटिंग १०० वर पोहोचली आहे. पर्यटनाबरोबर धार्मिक स्थळी जाण्याकडेही कल दिसून येत आहे.विदेशवारीकडे कलनाताळ आणि नववर्षासाठी बँकॉक, मॉरिशस, सिंगापूर आदींसह विदेशवारीकडेही अनेकांचा कल आहे. अनेकांनी काही महिन्यांअगोदरच नियोजन केलेले असल्याने त्यांना आगामी कमी दरात सहलीचा आनंद घेता येत आहे. परंतु ऐनवेळी नियोजन करणाऱ्यांना मात्र, अधिक रक्कम मोजावी लागत आहो. शिवाय अनेकांनी ग्रुपने बुकिंग करण्यास प्राधान्य दिल्याचे विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाताळ ते नववर्ष ‘हाऊसफुल’
By admin | Updated: December 25, 2014 00:47 IST
औरंगाबाद : नाताळ आणि नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी औरंगाबादकरांची पावले विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे वळत आहेत.
नाताळ ते नववर्ष ‘हाऊसफुल’
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}