शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांची भाजीमंडई फोटोसह

By admin | Updated: May 10, 2014 19:16 IST

आस्थाच्या शिबिरात मुले बनले भाजी विक्रेते

औरंगाबाद : छोट्यांना संधी दिली तर तेही व्यवहारज्ञान चटकन आत्मसात करू शकतात. नवनव्या गोष्टी शिकू शकतात. याचा अनुभव आस्था जनविकास संस्थेने ज्योतीनगर येथे छोट्या मुलांसाठी आयोजित केलेल्या भाजीमंडईमुळे आला. आपल्याकडीलच भाजी ताजी असल्याचे सांगत या विक्रेत्यांनी भरपूर व्यवसाय केला. या अनोख्या भाजी विक्रेत्यांचे नागरिक व पालकांनी कौतुक केले. मुलांना पाव, किलो, नग समजावेत, व्यवहारातील खाचाखोचा कळाव्यात, बोलीभाषा समजावी, दैनंदिन व्यवहारातील पैशांची देवाणघेवाण कळावी या हेतूने आयोजित या भाजीमंडईत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. सुमारे ४० बाल विक्रेते, तर एक हजारांहून अधिक ग्राहकांनी येथे ताज्या भाज्या खरेदी केल्या.आस्था जनविकास संस्थेने ज्योतीनगरमधील कवितेच्या बागेत पारंपरिक खेळांचे शिबीर आयोजित केले आहे. शिबिराचा एक भाग म्हणून ८ मे रोजी या भाजीमंडईचा उपक्रम झाला. मुलांनी धोतर, झब्बा, टोपी, उपरणे तर मुलींनी नऊवार, सहावार साड्या नेसून भाज्या विकल्या. बटाटे, कांदे, शेवग्याचा शेंगा, टमाटे, गवार, मेथी, पालक, कोथिंबिरीने कवितेची बाग मंडई म्हणून फुलली होती. काही मुलांनी कडधान्ये, आंबे, कैरी, टरबूज, सरबत, पापड, पाणीपुरी, भेळीचे स्टॉल लावून भाजीमंडईचे रूप अधिक आकर्षक केले होते. भाजीमंडईसाठी लागणारे साहित्य मुलांनी घरूनच पॅक करून आणले होते, तर काहींनी तराजूत मोजून आपला माल विकला. पोत्यांवर बसून ओरडून हे छोटे विक्रेते ग्राहकांना हाक देत होते. यासाठी शिबिरातील इतर मुलांनी त्यांना मदत केली. संध्याकाळी ५.३० वाजता सुरू झालेली भाजीमंडई दोन तास चालली. भाजपाच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस विजया रहाटकर, मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर, शिवसेनेच्या ज्योती काथार, राजकीय पक्षांचे नेते, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजी विकत घेतली.उपक्रमासाठी आस्थाच्या अध्यक्ष आरतीश्यामल जोशी, अश्विनी जहागीरदार, अंजू मुळे, रंजना तुळशी, स्मिता धवलशंख, आशा तेली, प्राजक्ता मुर्कीकर, रेखा क्षीरसागर, अंजली कालकर, वैभवी अंभ्यकर यांनी परिश्रम घेतले.