मुख्यमंत्र्यांची कचराकोंडीला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:14 AM2018-07-08T01:14:34+5:302018-07-08T01:15:18+5:30

पर्यटनाची राजधानी मागील साडेचार महिन्यांपासून कचऱ्यात आहे. शहरातील तब्बल १५ लाख नागरिक कचराकोंडीला जाम वैतागले आहेत. कचराकोंडीनंतर जाहीर कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात दाखल झाले. कचराकोंडीवर मुख्यमंत्री काय उपाय काढणार याकडे शहराचे लक्ष लागले होते. मात्र, शहरातील दोन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कचºयाचा ‘क’ शब्दही उच्चारला नाही.

 Chief Minister's garbage dump | मुख्यमंत्र्यांची कचराकोंडीला बगल

मुख्यमंत्र्यांची कचराकोंडीला बगल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी मागील साडेचार महिन्यांपासून कचऱ्यात आहे. शहरातील तब्बल १५ लाख नागरिक कचराकोंडीला जाम वैतागले आहेत. कचराकोंडीनंतर जाहीर कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात दाखल झाले. कचराकोंडीवर मुख्यमंत्री काय उपाय काढणार याकडे शहराचे लक्ष लागले होते. मात्र, शहरातील दोन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कचºयाचा ‘क’ शब्दही उच्चारला नाही. उलट मराठवाड्याचा ‘हळूहळू’ सर्वांगीण विकास होतोय असे सांगत नागरिकांच्या जखमेवर जणू मीठच चोळले.
शहरात १६ फेब्रुवारीपासून कचराकोंडी सुरू झालेली आहे. आणखी किती महिने ही कोंडी राहील याचा नेम नाही. सध्या शहरात तब्बल २० हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. पावसामुळे हा कचरा सडत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.
ज्या भागात कचºयाचे मोठ-मोठे डोंगर साचले आहेत, त्या भागातील नागरिकांना दुर्गंधीने मरण यातनाच सहन कराव्या लागत आहेत. महापालिकेने कचराकोंडी फोडण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या, प्रत्येक आघाडीवर अपयश येत आहे. घनकचरा व्यवस्थापनातील तज्ज्ञ म्हणून शासनाने आयुक्त म्हणून महापालिकेत डॉ. निपुण विनायक यांची नेमणूक केली. मागील दोन महिन्यांत आयुक्तांनाही कचराकोंडीत छाप पाडता आली नाही. त्यांनी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दीर्घ निविदा प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे कचºयाचा प्रश्न अधिक बिकट आणि जटिल बनला आहे.
शहर कचºयाने हैराण असताना शनिवारी मुख्यमंत्री शहरात आले. औरंगाबाद खंडपीठ व पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते कचराकोंडीवर एक शब्दही बोलले नाही. त्यामुळे महापालिकेसह औैरंगाबादकरांचा भ्रमनिराश झाला. नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असतानाही त्यांनी कचराकोंडीला सोयिस्करपणे बगल दिली.
शहराने भाजपला काय दिले?
च्मागील २० वर्षांमध्ये शहराने भाजपला भरभरून दिले आहे. १९९५ मध्ये भाजपचे फक्त ७ नगरसेवक होते. आज ही संख्या २६ पर्यंत गेली. हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांना विधानसभेत पाठविले. खा. रावसाहेब दानवे यांनाही लोकसभेत पाठविण्यासाठी शहराच्या काही मतदारांनी मदत केलीच आहे. एवढे सर्व दिल्यानंतर औैरंगाबादकरांच्या भाजपकडून बºयाच अपेक्षा आहेत. या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केले.

Web Title:  Chief Minister's garbage dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.