शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 12:55 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपा आयुक्त, पोलिस आयुुक्तांना निर्देश

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी सकाळी बुलढाणा येथे जाण्यापूर्वी चिकलठाणा विमानतळावर काही वेळ थांबले. त्यांनी शहराच्या परिस्थितीचा आणि विकास कामांचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील धार्मिक स्थळ हटविण्यासंदर्भात खंडपीठाचे आदेश आहेत. त्यानुसार प्रक्रिया सुरू केली. विविध पक्ष संघटनांनी याला कडाडून विरोध सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. धार्मिक स्थळ नियमित करण्यासाठी शासनाकडे त्वरित प्रस्ताव पाठवा, असे निर्देश त्यांनी मनपा प्रशासक, पोलिस आयुक्तांना दिले.

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी शहराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मी आणि पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी धार्मिक स्थळांच्या मुद्यावर होत असलेल्या विरोधाची संपूर्ण माहिती दिली. त्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवा, आम्ही नियमित करण्यासाठी विचार करू, असे सांगितले. धार्मिक स्थळ नियमित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि विद्यापीठ प्रशासनाकडून शासनाला लवकरच सादर होईल, अशी अपेक्षा जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली.

विविध पक्ष, संघटनांकडून कडाडून विरोधखंडपीठात दाखल याचिकेवर दोन आठवड्यांपूर्वी सुनावणी झाली. खंडपीठाने धार्मिक स्थळ हटविण्यासंदर्भात निर्देश दिले. त्यासाठी खंडपीठाच्या निर्देशानुसार एक समिती सुद्धा गठित करण्यात आली. या समितीची एक बैठक घेण्यात आली. बैठकीत खंडपीठाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळांना पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या. या प्रक्रियेला विविध पक्ष, संघटनांकडून कडाडून विरोध सुरू झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा विषय ऐरणीवर आल्यावर प्रशासनही चांगलेच संकटात सापडले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देऊन काही प्रमाणात दिलासा दिला आहे.

७ ऑक्टोबरला माेर्चाविद्यापीठ कार्यक्षेत्राच्या बाहेर असलेल्या बौद्ध विहार आणि विपश्यना केंद्रालाही पोलिसांनी मागील आठवड्यात नोटीस बजावली. त्यामुळे बौद्ध अनुयायांनी संताप व्यक्त केला. मुळात ही जागा वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. या प्रकरणाची चाैकशी करावी या मागणीसाठी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण