मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, औरंगाबाद जिल्हा परिषदेत ठराव पारित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 16:28 IST2018-07-26T16:26:49+5:302018-07-26T16:28:23+5:30
मराठा आरक्षण लागू करण्यास अपयशी ठरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असा ठराव आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पारीत करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, औरंगाबाद जिल्हा परिषदेत ठराव पारित
औरंगाबाद : मराठा आरक्षण लागू करण्यास अपयशी ठरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असा ठराव आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पारीत करण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरु आहे. याबाबत आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षण लागू करण्यास अपयशी ठरले आहेत. यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असा ठराव पारित करण्यात आला.