मराठवाड्याचे आर्थिक इंजिन सुसाट! छ. संभाजीनगरच्या उद्योजकांनी भरला ४, ९६७ कोटींचा GST

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 17:45 IST2026-04-13T17:43:10+5:302026-04-13T17:45:02+5:30

बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनाचा 'पॉझिटिव्ह' इम्पॅक्ट; संभाजीनगर, जालना आणि नांदेड मिळून ७,११६ कोटींची वसुली

Chhatrapati Sambhajinagar Records GST Collection of Rs 4,967 Crore; 7.52% Growth Over Target | मराठवाड्याचे आर्थिक इंजिन सुसाट! छ. संभाजीनगरच्या उद्योजकांनी भरला ४, ९६७ कोटींचा GST

मराठवाड्याचे आर्थिक इंजिन सुसाट! छ. संभाजीनगरच्या उद्योजकांनी भरला ४, ९६७ कोटींचा GST

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात बहुराष्ट्रीय-राष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने आणखी एक विक्रम केला. गत आर्थिक वर्षात येथील उद्योजक, व्यावसायिकांनी ४ हजार ९६७ कोटी ५५ लाख रुपयांचा राज्य जीएसटी भरला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत उद्दिष्टापेक्षा ७.५२ टक्के अधिकची भर पडली आहे.

राज्य जीएसटी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात ४ हजार ६२० कोटी १५ लाख रुपयांची जीएसटी वसूल करण्यात आली होती. २०२५-२६ या गत आर्थिक वर्षात जीएसटी वसुली तब्बल ३४७ कोटी ४१ लाख रुपयांनी वाढून ४ हजार ९६७ कोटी ५५ लाखांपर्यंत जाऊन पोहोचली. एकूण जीएसटी वसुलीत ७.५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, बाजूच्या जालना जिल्ह्यात मात्र, ०.२३ टक्क्यांनी वसुलीत घट झाली. जिथे दोन वर्षांपूर्वी १०७४ कोटी २३ लाख रुपयांचा जीएसटी जालनातील उद्योग, व्यावसायिकांनी भरला होता तिथे गतवर्षी १०७१ कोटी ७७ लाख रुपये एवढाच जीएसटी भरला. म्हणजे २ कोटी ४५ लाख रुपयांनी येथे वसुली कमी झाल्याचे दिसून आले. त्या तुलनेत नांदेड विभागाने चांगली कामगिरी केली. २०२४-२५ पेक्षा मागील २०२५-२६ या वर्षात ११६ कोटी ७२ लाख रुपये जास्त वसुली करून १०७६ कोटी ८० लाख रुपयांचा जीएसटी भरला. यामुळे राज्यसरकारच्या तिजोरीत १२.१६ टक्क्यांनी वाढ झाली.

संभाजीनगर, जालना, नांदेड मिळून जीएसटी वसुलीत ६.९४ टक्के वाढ
छत्रपती संभाजीनगर, जालना व नांदेड विभागातील जीएसटी वसुलीची एकूण आकडेवारी पाहिली तर ६.९४ टक्के वाढ झाली. या विभागात एकूण ८८ हजार ४९५ करदाते आहेत. त्यांनी ४६१ कोटी ६८ लाख रुपयांची अधिकची भर घालत गत आर्थिक वर्षात ७११६ कोटी १३ लाख जीएसटीत जमा केले. राज्य जीएसटी विभागाच्या सांघिक कामगिरीमुळे जालना विभागाचे अपयश लपले गेले.

पुढील वर्षी जीएसटी वसुलीत आणखी वाढ
छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आगमन होत आहे. त्यांचे उत्पादन सुरू झाल्यावर जीएसटी वसुलीत आणखी वाढ होईल. यासोबत व्यावसायिकांची संख्या वाढत आहे. त्यांच्या व्यवसायांचाही विस्तार होत आहे. यामुळे येत्या वर्षात याचा सकारात्मक परिणाम जीएसटी वसुलीत बघण्यास मिळेल.
-अभिजित राऊत, अपर आयुक्त, राज्य जीएसटी छत्रपती संभाजीनगर

Web Title : मराठवाड़ा का आर्थिक इंजन दहाड़ा; छत्रपति संभाजीनगर ने ₹4,967 करोड़ GST भरा।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर का जीएसटी संग्रह ₹4,967.55 करोड़ तक पहुंचा, जो लक्ष्य से 7.52% अधिक है। जबकि जालना में थोड़ी गिरावट देखी गई, वहीं नांदेड़ ने 12.16% की वृद्धि के साथ उत्कृष्ट प्रदर्शन किया। कुल मिलाकर, संभाजीनगर, जालना और नांदेड़ मंडलों में नए उद्योगों और व्यापार विकास से जीएसटी में 6.94% की वृद्धि देखी गई।

Web Title : Marathwada's economic engine roars; Chhatrapati Sambhajinagar fills ₹4,967 crore GST.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's GST collection surged to ₹4,967.55 crore, exceeding targets by 7.52%. While Jalna saw a slight dip, Nanded excelled with a 12.16% increase. Overall, Sambhajinagar, Jalna, and Nanded divisions witnessed a 6.94% rise in GST, driven by new industries and business growth.