छत्रपती संभाजीनगर : बनावट नोटा तयार करून देण्याचे आमिष दाखवून हातचलाखीने नागरिकांची लुबाडणूक करण्यासाठी आलेल्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई शुक्रवारी पहाडसिंगपुरा भागात केल्याची माहिती बेगमपुरा पोलिसांनी दिली.
आराेपींमध्ये शेख फेरोज शेख रफिक (३१) आणि शेख वसीम शेख ताहेर (२९, दोघेही रा. बिलोली, नांदेड) या दोघांचा समावेश आहे. पोलिस हवालदार दीपक मालकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इनोव्हा कारमधून (टीएस ०७ जेडब्ल्यू ०६६६) दोघे जण पहाडसिंगपुरा भागात बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांच्या पथकाने दुपारी २:३० वाजेच्या सुमारास न्यू पहाडसिंगपुरा येथील मुख्य रस्त्यावर सापळा रचला. तेथे संशयित कार आणि त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींच्या कारची झडती घेतली असता ५०० रुपयांच्या नोटांच्या आकाराचे पांढऱ्या कागदांचे बंडल, एक दोन बाय अडीच फुटांचा प्लायवूडचा चौकोनी बॉक्स (ज्यावर बटणे, प्लग, लाइट्स आणि व्होल्टेज मीटर लावून मशीनसारखे रूप दिले होते), आयोडिन द्रव्याची प्लास्टिकची बाटली, इलेक्ट्रिक वायर्स आणि पांढरी पावडर असा एकूण १,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
असा करीत होते विश्वास संपादनआरोपी ५०० रुपयांच्या चलनातील नोटांना आयोडिन लावून काळे करीत. या काळ्या झालेल्या नोटा एका प्लेटवर ठेवून, वीज प्रवाह असलेला खोटा मशीनचा बॉक्स चालू करून, त्या नोटा सल्फ्युरिक पावडरने धुऊन दाखवत. त्यातील पावडरमुळे खऱ्या नोटेवरील आयोडिन निघून जाऊन नोट स्वच्छ होत असे. तीच खरी नोट बाजारात चालवण्यासाठी देऊन विश्वास संपादन केला जात होता.
एका लाखाच्या बदल्याच चार लाखबनावट नोटा बनवून देण्याऱ्यावर विश्वास बसल्यानंतर ते एका लाखाच्या बदल्यात चार लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत होते. संबंधितांना पांढऱ्या कागदांचे बंडल देऊन पसार होत होते.
मालेगाव पोलिसांनी केली होती कारवाई८ फेब्रुवारी रोजी मालेगाव पोलिसांनी बनावट नोटांप्रकरणी शहरातील संतोष केळसकर याला अटक केली होती. मागील वर्षीही वाळूज परिसरातील एका बंगल्यात सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता.
Web Summary : Two men were arrested in Sambhajinagar for luring people with a 'magic machine' promising fake currency. They used a fake machine to fool victims, promising four lakh fake rupees for one lakh real rupees. Police seized fake notes and equipment.
Web Summary : संभाजीनगर में दो लोगों को 'मैजिक मशीन' से नकली नोटों का लालच देने के आरोप में गिरफ्तार किया गया। वे पीड़ितों को धोखा देने के लिए एक नकली मशीन का इस्तेमाल करते थे, एक लाख असली रुपये के बदले चार लाख नकली रुपये देने का वादा करते थे। पुलिस ने नकली नोट और उपकरण जब्त किए।