शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

६० तस्करांची यादी तयार; आठ दिवसांत घरांवर चालणार छत्रपती संभाजीनगर मनपाचा 'बुलडोझर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 18:42 IST

पोलिस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना दिली यादी, खातरजमा करून सुरू होणार कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात अमली पदार्थांचे रॅकेट चालवणारे स्मगलर्स, विक्रेत्यांचे थकीत पाणीपट्टी व बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवण्यासाठी ६० गुन्हेगारांची यादीच पोलिसांनी सोमवारी महापालिका प्रशासनाला पाठवली. खातरजमा करून आठ दिवसांतच पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली जाणार असल्याचे शहरात पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांनी गेल्या वीस दिवसांपासून विविध प्रकारच्या ड्रग्जच्या पेडलर्स, स्मगलर्सचे जाळे उद्ध्वस्त करण्याची मोहीमच हाती घेतली आहे. २५ जानेवारीला पहिल्या कारवाईनंतर ७ फेब्रुवारीपर्यंत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर व त्यांच्या पथकाने १६ जणांना अटक करत १३ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अशफाक पटेल सध्या पसार आहे. अशपाक राज्याबाहेर गेला असला तरी त्याच्या सख्ख्या भावासह त्याच्या अन्य १५ साथीदार पोलिसांच्या हाती लागले. तर ४६ नव्या तस्करांची नावे समोर आली असून ते सर्व पसार झाले आहेत.

काय म्हटलेय पत्रात?पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांना सोमवारी कारवाईबाबत पत्र पाठवले. त्यात ६० रेकॉर्डवरील गुन्हेगार, अमली पदार्थांच्या तस्करांचे नाव आणि राहत असलेले घर तसेच अन्य मालमत्तांची माहिती दिली. सदर सर्व मालमत्ता अमली पदार्थ विक्री करण्यासाठी वापरत असून ते अनधिकृत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या इमारती, घरांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून उच्च न्यायालयाचे आदेश व मनपाच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर सर्व बांधकामे निष्कासित करावे. या कारवाईसाठी योग्य पोलिस बंदोबस्त पुरवण्याचे आश्वासन पत्रात देण्यात आले आहे.

सर्वाधिक जिन्सी, सिटी चौकातील स्मगलर्स६० जणांच्या यादीत प्रामुख्याने मुख्य तस्कर शेख अशफाक शेख इसाक पटेल (रा. रवींद्रनगर व शहाबाजार, चंपाचौक), ज्ञानेश्वर उर्फ माऊली मनोहर यादव (रा. गल्ली क्र. १४, जयभवानीनगर), सय्यद फैजल उर्फ तेजा (रा. किलेअर्क), अजय व राणी ठाकूर (रा. सातारा गाव), अनिल अंबादास साळवे व अरुण अंबादास माळवे (रा. सावित्रीनगर, चिकलठाणा), आदिल बिन हमद बिन चाऊस (रा. काचिवाडा, शहाबाजार), विश्वनाथ उर्फ कोल्ह्या पिंपळे (रा. गल्ली क्र. १५, संजयनगर), विशाल छगन तामचीकर (रा. नारेगाव) यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक गुन्हेगार जिन्सी व सिटीचौक, नारेगाव परिसरातील आहेत.

आठ दिवसांत कारवाईएकूण ७० गुन्हेगारांची यादी तयार आहे. त्यापैकी ६० गुन्हेगारांच्या मालमत्तांबाबत पत्र पाठवले आहे. त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच पोलिस बंदोबस्तात त्यांचे बेकायदेशीर बांधकाम पाडले जाईल. आता सर्व बाजूने ड्रग्ज तस्करांना घेरले जाईल.- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad Cracks Down: 60 Drug Smugglers Face Demolition Within Days

Web Summary : Aurangabad police submitted a list of 60 drug criminals to the Municipal Corporation for demolition of illegal properties. The crackdown, targeting drug dealers and their assets, aims to dismantle drug networks. Police promised security for the demolitions, planned within eight days, focusing on areas like Jinci and City Chowk.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDrugsअमली पदार्थEnchroachmentअतिक्रमण