जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रशासकपदी नियुक्ती
By मुजीब देवणीकर | Updated: May 2, 2023 17:48 IST2023-05-02T17:47:33+5:302023-05-02T17:48:07+5:30
डॉ. अभिजीत चौधरी यांची राज्याच्या टॅक्स विभागाच्या सह आयुक्तपदी नेमणूक

जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रशासकपदी नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांची मंगळवारी राज्य शासनाने बदली केली. त्यांच्या जागेवर जीएसटी विभागाचे सहआयुक्त जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली. चौधरी यांना राज्याच्या टॅक्स विभागाच्या सह आयुक्तपदी नेमण्यात आले. या जागेवर मागील काही वर्षांपासून जी. श्रीकांत काम पाहत होते.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून चौधरी यांच्या बदलीची चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार प्रशासक यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यांनीच बदलीसाठी शिफारस केल्याची चर्चा मनपात होती. चौधरी यांनी पंतप्रधान आवास योजनेतील काही घोटाळेही समोर आणले. या प्रकरणाची थेट ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. स्थानिक पोलीसांकडून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.