छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत ५७ नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजप पूर्ण बहुमतामध्येच आहे, हे स्पष्ट असल्यामुळे महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होणार आहे. यासाठी स्थानिक कोअर कमिटीने मंगळवारी प्रदेश समितीकडे महापौर, उपमहापौर, गटनेता या पदासाठी प्रत्येकी चार नगरसेवकांची नावे पाठविली आहेत.
महायुतीमध्ये शिंदेसेना सोबत असेल. मात्र, त्यांना पालिकेतील कोणतेही पद मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी सकाळी ९ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत जि.प. निवडणुकीसह महापौरपदाच्या उमेदवाराच्या नावावर स्थानिक नेत्यांकडून चिकलठाणा येथील पक्ष कार्यालयात आढावा घेतला. मात्र, प्रत्येकाच्या मनात वेगळे नाव असल्यामुळे स्थानिकांचे एकमत झाले नाही. शेवटी जाताना त्यांनी नावांची यादी पाठविण्याच्या सूचना केल्यानंतर कोअर कमिटीने प्रत्येक पदासाठी चार जणांची नावे पाठविली. मनपा निवडणुकीचा निकाल लागून १९ दिवस उलटले आहेत. राज्यातील सर्व ठिकाणचे निर्णय होत आले. मात्र, अजूनही येथील भाजपचा महापौर, उपमहापौर व गटनेता ठरलेला नाही, त्यामुळे सगळ्या इच्छुकांची घालमेल सुरू असून प्रदेशाध्यक्षांसह कोअर कमिटीच्या मागे-पुढे सगळे इच्छुक फिरत होते.
प्रदेशाध्यक्षांचे नशिबाकडे बोटज्याच्या प्रारब्धात असेल तो महापौर होईल. मंत्री सावे, खा. कराड, शिरीष बोराळकर, आ. केणेकर, राज्यपाल हरिभाऊ बागडे, भाजप नेते रावसाहेब दानवे, शहराध्यक्ष शितोळे, मंगरूळे यांची प्रत्येकांची आपापली नावे आहेत. त्यांनी एकत्रितपणे एखादे नाव पाठविले तर उत्तमच आहे किंवा सगळ्यांनी सगळ्या इच्छुकांची नावे दिली तरी वरिष्ठ एखादे नाव निश्चित करतील किंवा स्थानिकांचे एकमत झाले तर निर्णय घेणे सोपे होईल. बहुमत असल्यामुळे आता ‘आऊटपुट’ द्यावे लागणार आहे. येथे कुणीही निवडून आलेले नाही. जनतेने निवडून दिले आहे. मनपाचे विश्वस्त म्हणून काम करावे लागेल, मालक म्हणून काम केले तर पुढे हाल होतील. मनपात एमआयएम सदस्य असले तरी ते देखील विकासकामांचीच मागणी करतील, विकास हाच आमचा अजेंडा आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे प्रचारात नेते नाहीत. त्यामुळे जि.प., पं.स. निवडणुका आता कार्यकर्त्यांच्या भरवशावर लढविल्या जात आहेत.आ. रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष
सर्वांना अर्ज भरण्यास लावतील आणि...पक्ष सर्व इच्छुकांना अर्ज भरण्यास लावतील, १० फेब्रुवारी रोजी महापौर निवडणुकीच्या दिवशी एकाचाच अर्ज ठेवतील. बाकीच्यांचे अर्ज मागे घेण्यास लावतील. जि.प. निवडणुकीवर महापौरपदाच्या उमेदवार निवडीचा परिणाम होऊ नये, यासाठी ही सगळी खटाटोप सुरू असल्याची चर्चा पक्षातील काही नगरसेवकांनी व्यक्त केली.
कोअर कमिटीचे मत
कमिटीची बैठक झाली, जेवढे आहेत, त्या इच्छुकांची नावे प्रदेश समितीकडे दिली आहेत.अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री
गटनेता बुधवारी ठरेल. महापौरपदासाठी चौघांची नावे वरिष्ठांकडे पाठविली आहेत.डॉ. भागवत कराड, खासदार
प्रदेश समितीला महापौरपदासाठी नावे पाठविली असून वरिष्ठांकडून नाव अंतिम होईल.संजय केणेकर, आमदार
सर्वांनी एकमुखी ठराव करून चार नावे दिली आहेत. वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल.बसवराज मंगरूळे, सदस्य
महापौर, उपमहापौरपदासह गटनेता पदासाठी प्रत्येकी चार नगरसेवकांची नावे पाठविली आहेत.किशोर शितोळे, शहराध्यक्ष
Web Summary : BJP will likely secure Chhatrapati Sambhajinagar's mayor post. Factionalism delays decision, names sent to state committee. Fate, consensus, or high command will decide.
Web Summary : भाजपा छत्रपति संभाजीनगर के महापौर पद को सुरक्षित करेगी। गुटबाजी से निर्णय में देरी, नाम राज्य समिति को भेजे गए। भाग्य, सहमति, या आलाकमान तय करेगा।