शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कच्चा मालाच्या दरात मोठी वाढ; 'ऑटोमोबाईल हब' छ. संभाजीनगरचे आर्थिक गणित कोलमडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:16 IST

छत्रपती संभाजीनगरच्या उद्योगांवर दुहेरी संकट, कच्चा मालाच्या दरात मोठी वाढ अन् कामगारांचाही घरवापसीचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : युद्धामुळे आधीच गॅस तुटवड्याचा सामना करीत असलेल्या उद्योगांंच्या कच्च्या मालाचे दर दीडपट वाढले आहेत. यामुळे उद्योगांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे उद्योजक सांगत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधील विविध औद्योगिक वसाहतींत बहुआयामी उद्योग आहेत. मात्र सर्वाधिक उद्योग हे वाहन निर्मिती अर्थात ऑटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित आहेत. जगभरातील विविध नामांकित वाहन निर्मिती कंपन्यांना येथील इंडस्ट्रीतून सुट्या भागांचा पुरवठा केला जातो. यातील ॲल्युमिनिअम, तांबे, प्लास्टिकच्या कच्च्या मालाचे दर वाढले असल्याचे उद्योजकांनी सांगितले. महिनाभरापूर्वी कॉपरचे दर ९०० रुपये किलो होते. ते आता १ हजार ४०० रुपयांपर्यंत गेले आहेत. तर ॲल्युमिनिअमचे दर १०० रुपये प्रति किलोने वाढले. 

प्लास्टिक दाण्यांचा दर दुप्पट झाल्याचे मसिआ संघटनेचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी सांगितले. वाळूज इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष वसंत वाघमारे म्हणाले की, युद्ध सुरू झाल्यापासून इंडस्ट्रीला लागणारा कच्च्या मालाची आयात कमी झाली. त्यामुळे कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातूनच गेल्या आठ ते दहा दिवसांत कच्च्या मालाचे दर २५ ते ३० टक्के वाढले. दर वाढलेले असले तरी उद्योगांना लागणारा कच्चा माल घ्यावाच लागणार आहे. यातून उद्योजकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढणार आहे. परिणामी, वस्तूंच्या किमती वाढतील. याचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

प्लास्टिक रॉ मटेरियल, कॉपर, स्टीलची आपल्या इंडस्ट्रीला गरज असते. प्लास्टिक मॅट उद्योगांचा माल आखाती देशात निर्यात होताे. मॅट बनवण्यासाठी लागणारा प्लाास्टिक ग्रॅन्युअल हे पेट्रोलियम प्रॉडक्ट असते. काही दिवसांपासून प्लास्टिक ग्रॅन्युअलचे दर वाढले. सोबतच कॉपर, स्टीलचेही दर वाढले आहेत.- अनिल पाटील, माजी अध्यक्ष, मसिआ

कामगारांना स्वयंपाकाचा गॅस मिळेना...विविध कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगार कार्यरत आहेत. त्यांच्याकडे नोंदणीकृत गॅस कनेक्शन नाही. ते कुणाकडून तरी गॅस घेत असत. मात्र, आठ दिवसांपासून गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी कामगार करीत आहेत. घरमालक हिटर अथवा इलेक्ट्रिक शेगडी वापरू देत नाही. आमच्यासाठी गॅस उपलब्ध करा अन्यथा आम्ही गावाकडे जातो, असे कामगार सांगत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Raw Material Price Hike Threatens Aurangabad's Automobile Industry, Economy

Web Summary : Aurangabad's automobile industry faces crisis as raw material costs surge due to war-related shortages. Copper, aluminum, and plastic prices have skyrocketed, impacting production costs and potentially consumer prices. Gas shortages further exacerbate worker challenges.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaluj MIDCवाळूज एमआयडीसीMIDCएमआयडीसी