शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मान्यता मिळण्यापूर्वीच शाळा २० किमी दूर नेली; होली एंजल इंग्लिश शाळेचा प्रताप, आरटीई विद्यार्थी वाऱ्यावर

By राम शिनगारे | Updated: March 27, 2026 19:45 IST

आरटीई विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शाळेच्या स्थलांतरावरून सिडको परिसरात पालकांचा तीव्र संताप

छत्रपती संभाजीनगर : संस्था चालकाने मूळ शासकीय मान्यता असलेल्या ठिकाणाहून शाळा विनापरवानगी थेट ७ ते ८ किलोमीटर अंतरावर स्थलांतरित केली. तेथूनही मान्यता न घेताच परस्पर पुन्हा २० किलोमीटर अंतरावर शाळा स्थलांतरित करण्याचा प्रताप केला. प्रारंभी या शाळेत ‘आरटीई’अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांनाही स्थलांतरित झालेल्या ठिकाणी बसने घेऊन जाण्यात येत होते. मात्र, त्यातील अनेकांच्या पालकांनी आक्षेप घेतल्यानंतर तेवढ्याच विद्यार्थ्यांना एका ठिकाणी व उर्वरित विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी शिकविण्यात येत असल्याचा प्रकार होली इंग्लिश एंजल शाळेने केला आहे.

प्राथमिक शालेय शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालानुसार होली एंजल इंग्लिश स्कूलला २००९ मध्ये शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार रेणुकानगर, गारखेडा परिसर याठिकाणी पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्ग भरणविण्यात येत होते. २०१७-१८ मध्ये शाळा मूळ ठिकाणी न भरवताच ७ ते ८ किलोमीटर अंतरावर एन-३, सिडको परिसरात भरविण्यास सुरुवात केली. त्याच वर्षीपासून ‘आरटीई’अंतर्गत विद्यार्थ्यांचेही शाळेत प्रवेश देण्यात आलेले आहेत. मागील वर्षी २६ मे २०२५ पासून एन-३, सिडको परिसरातून शाळा गट नं.२३०, निपाणी, बीड रोड येथे स्थलांतरित करण्यात आली आहे. या स्थलांतरास मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित असल्याचेही शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. मान्यता मिळण्यापूर्वीच स्थलांतर करण्यास आरटीईच्या पालकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तेव्हा शाळा व्यवस्थापनाने संबंधित विद्यार्थ्यांची वर्षभर मोफत ने-आण केली. मात्र, तरीही २० किलोमीटर अंतरावरील शाळेत पाल्यांना पाठविण्यास पालकांनी विरोध दर्शविला आहे. याविरोधात पालकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेत विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची मागणी केली आहे.

पालकांना हवे समायोजनशाळेत पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या परिसरातीलच शाळेत समायोजन करण्यात यावे, अशी मागणीच पालकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याशिवाय सध्या शाळेत केवळ आरटीईच्या विद्यार्थ्यांनाच स्वतंत्र शिकविण्यात येत असून, शाळेतील इतर विद्यार्थी निपाणी येथे शिक्षण घेतात. त्याचा वाईट परिणाम आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या मनावर होत असल्याचा दावाही पालकांनी केला आहे.

मान्यता प्रस्ताव मंत्रालयस्तरावर प्रलंबितएन-३, सिडको परिसरात सुरू असलेल्या शाळेची इमारत भाडेतत्त्वावर घेतलेली होती. ही इमारत खाली करण्यासाठी संबंधित घरमालकाने नोटीस दिली. त्यामुळे आता शाळा स्वत:च्या मालकीच्या जागेत आणि इमारतीमध्ये निपाणी परिसरात सुरू केली आहे. विद्यार्थ्यांची ने-आण शाळा व्यवस्थापनाकडूनच नि:शुल्क केली जाते. त्याशिवाय ‘आरटीई’च्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे आक्षेप आहेत त्यांना एन-३, सिडको परिसरातच शिक्षण देण्यात येत आहे. शाळेच्या स्थलांतराचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांच्या मान्यतेनंतर मंत्रालयस्तरावर प्रलंबित आहे.- मुख्याध्यापक, एंजल इंग्लिश स्कूल

मान्यतेनंतर स्थलांतर होईलसंबंधित शाळेच्या स्थलांतराला शासनाने मान्यता दिलेली आहे. ही मान्यता येण्यापूर्वी कोणालाही स्थलांतर करता येणार नाही. जर नियमबाह्य स्थलांतर झाले असेल तर शालेय शिक्षण विभाग योग्य ती कार्यवाही करील.-जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : School Moved Before Approval; RTE Students Suffer, Alleges Parents.

Web Summary : Angel English School moved locations twice without permission, leaving RTE students stranded. Parents protest the unauthorized relocation and demand student placement in local schools. The school claims the move is due to building issues and awaits approval.
टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRight To Educationशिक्षण हक्क कायदा