छत्रपती संभाजीनगर फ्लॅशबॅक २०१५: युतीत शिवसेना होता सर्वांत मोठा पक्ष, दुसऱ्यास्थानी MIM
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:54 IST2025-12-17T17:49:52+5:302025-12-17T17:54:56+5:30
शिवसेना-भाजप युतीने काही अपक्षांच्या मदतीने बहुमताचा ५८ आकडा पार करीत पाच वर्षे मनपावर राज्य केले होते.

छत्रपती संभाजीनगर फ्लॅशबॅक २०१५: युतीत शिवसेना होता सर्वांत मोठा पक्ष, दुसऱ्यास्थानी MIM
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना-भाजप युतीने २०१५ मध्ये युतीत निवडणूक लढली होती. २८ उमेदवार निवडून आणत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता एमआयएम. या पक्षाचे तब्बल २४ नगरसेवक निवडून आले होते. विशेष बाब म्हणजे, या पक्षाने शहरात महापालिकेची पहिलीच निवडणूक लढली होती. भाजपला २३ जागांवर समाधान मानावे लागले होते. शिवसेना-भाजप युतीने काही अपक्षांच्या मदतीने बहुमताचा ५८ आकडा पार करीत पाच वर्षे मनपावर राज्य केले होते.
मागील काही वर्षांत राजकीय परिस्थिती बदलली. शिवसेनेत फूट पडून शिंदेसेना आणि उद्धवसेना असे दोन पक्ष झाले. उद्धवसेनेतील अनेक माजी महापौर, नगरसेवक शिंदेसेनेत गेले. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची महायुती आहे. विरुद्ध दिशेला काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार हे तीन पक्ष महाविकास आघाडीत आहेत. मात्र, दोघांमध्ये अद्याप मनपा निवडणुकीसाठी युती-आघाडीची घोषणा झालेली नाही. युतीसंदर्भात सर्वच राजकीय पक्ष एकमेकांसोबत चर्चा करीत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी घोषणा होताच युतीसंदर्भात राजकीय पक्षांच्या जोरबैठका वाढणार, हे निश्चित!
२०१५ चे पक्षीय बलाबल
शिवसेना- २८
भाजप- २३
एमआयएम-२४
काँग्रेस-१२
अपक्ष-१८
बीएसपी-०४
राष्ट्रवादी काँग्रेस-०४
रिपाइं (डी.)- ०२
एकूण -११५
असे आहे आरक्षण
ओबीसीसाठी ३१ जागा, त्यामध्ये १६ महिलांचा समावेश आहे. एसटी प्रवर्गासाठी २, त्यात एक महिला, एससी प्रवर्गासाठी २२ जागा आहे. त्यात ११ महिलांसाठी आरक्षित आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी ३० जागा आहेत. मनपात एकूण ५५ जागा आरक्षित आहेत.