व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा; ३००० रुपयांना 'ब्लॅक'ने विक्री, हॉटेलमध्ये पेटल्या चुली

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 12, 2026 13:54 IST2026-03-12T13:54:04+5:302026-03-12T13:54:31+5:30

छत्रपती संभाजीनगर गॅस अपडेट; ७४ एजन्सीमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा साठा संपला, मंगल कार्यालयात आता इंडक्शन शेगडीचा वापर

Chhatrapati Sambhajinagar Faces Commercial Gas Shortage; Cylinders Being Sold at ₹3000 in Black Market | व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा; ३००० रुपयांना 'ब्लॅक'ने विक्री, हॉटेलमध्ये पेटल्या चुली

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा; ३००० रुपयांना 'ब्लॅक'ने विक्री, हॉटेलमध्ये पेटल्या चुली

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ७४ गॅस एजन्सी असून बहुतांश एजन्सीमधील व्यावसायिक सिलिंडरचा साठा संपल्याचे गॅस वितरकांनी सांगितले. एजंट त्यांच्याकडील शिल्लक काही सिलिंडर थेट ३००० रुपयांना ‘ब्लॅक’ने विकत असल्याचा आरोप हॉटेल व्यावसायिकांनी केला.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अभूतपूर्व तुटवडा असून, याचा फटका हॉटेल व्यवसायाला बसत आहे. व्यावसायिक नाइलाजास्तव पारंपरिक चूल, लाकूड आणि कोळशाकडे वळत आहेत.

एजन्सी मालक म्हणतात, सिलिंडर ब्लॅकने विकणाऱ्यांची नावे सांगा...
शहरातील काही हॉटेल, हातगाडीवर नाश्ता तयार करणारे आणि खानावळी काही बंद तर काही चालू आहेत. ज्या काही चालू आहेत, त्यातील काही जणांनी सांगितले की, आम्ही व्यावसायिक सिलिंडर दुप्पट पैसे देऊन घेतले आहेत. काही एजंट ३ हजार रुपयांना सिलिंडर विकत आहेत, असा आरोप केला.
एजन्सी मालकांनी यासंदर्भात सांगितले की, एजंट व्यावसायिकांना सिलिंडर नेऊन देतात. आमच्याकडील साठा संपला आहे. एजंट त्यांच्या ग्रामीण भागातील गोदामातील साठा ते शहरात आणून विकत असावेत.

एका गॅस एजन्सी चालकाने सांगितले की, एका मोठ्या हॉटेलच्या व्यवस्थापकाने चक्क ४ हजार रुपये घ्या पण सिलिंडर द्या, अशी मागणी केली. कोणी जास्त दरात व्यावसायिक गॅस सिलिंडर विकत असेल तर त्याची तक्रार एजन्सी मालकाकडे किंवा पुरवठा विभागाकडे करावी, असे आवाहनही एजन्सी मालकांनी केले.

मंगल कार्यालयात इंडक्शन व भट्टीचा पर्याय
शहरातील कॅटरिंग व्यावसायिकांची मंगळवारी बैठक झाली. त्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पर्याय इंडेक्शन व सरपण, दगडी कोळसा भट्टीच्या पर्यायावर मंथन झाले. वाळूज औद्योगिक परिसरात मोठे इंडेक्शन आले आहेत. त्याचा लग्नात वापर होऊ शकतो. यामुळे मंगल कार्यालयात इंडक्शन शेगडी तर मैदानावर होणाऱ्या लग्नसोहळ्यात सरपण किंवा दगडी कोळशावरील भट्टीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महेश लाहोटी, अध्यक्ष, कॅटरर्स संघटना.

काही चाट भांडारांत पेटल्या भट्ट्या
काही चाट भांडार व रेस्टॉरंट मालकांनी थेट सरपण पेटवून भट्ट्या सुरू केल्या. जवाहर कॉलनीतील चाट भांडार चालकाने पहिल्याच दिवशी २ क्विंटल सरपण लागल्याचे सांगितले.

Web Title : व्यावसायिक गैस सिलेंडर की कमी: काला बाजारी बढ़ी, होटल लकड़ी पर निर्भर

Web Summary : औरंगाबाद में व्यावसायिक गैस सिलेंडर की भारी कमी। काला बाजारी ₹3000 तक पहुंची, होटल लकड़ी के चूल्हे इस्तेमाल करने को मजबूर। कैटरर इंडक्शन और कोयले का विकल्प ढूंढ रहे, स्थानीय व्यवसाय प्रभावित।

Web Title : Commercial Gas Cylinder Shortage: Black Market Soars, Hotels Turn to Wood

Web Summary : Aurangabad faces severe commercial gas cylinder shortage. Black market prices surge to ₹3000, forcing hotels to use traditional methods like wood-fired stoves. Caterers explore induction cooktops and coal as alternatives, impacting local businesses.