शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेच्या आमदाराला हवी उद्यानातील १ एकर जागा; भाजप नगरसेवकांचा कडाडून विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:26 IST

सिडको एन-४ मधील उद्यानाची जागा आमदारांच्या संस्थेला देऊ नका; भाजप नगरसेवकांचे मनपा आयुक्तांना साकडे

छत्रपती संभाजीनगर: सिडको एन-४ भागातील पारिजातनगर येथील उद्यानासाठी राखीव असलेल्या ५ एकर जागेवरून आता नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे. यातील १ एकर जागा शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या 'मॉर्डन शिक्षण प्रसारक मंडळाला' खेळाच्या मैदानासाठी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, याला प्रभाग २३ मधील भाजपच्या चारही नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवला असून, ही जागा कोणालाही देऊ नये, असे साकडे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांना घातले आहे.

काय आहे नेमका वाद?सिडको एन-४ मधील सर्व्हे नंबर २३-२४ मध्ये उद्यानाची ५ एकर जागा आहे. यातील १ एकर जागा आपल्या संस्थेला मिळावी यासाठी आमदार बोरनारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने आयुक्तांना तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. ही बाब समजताच स्थानिक भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, बालाजी मुंडे, सत्यभामा शिंदे आणि सुरेखा गायकवाड यांनी गुरुवारी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.

रहिवाशांचाही खंबीर पाठिंबायेथील नागरिकांनी 'पारिजात नगर प्रतिष्ठान' संस्था स्थापन केली असून, उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेतून स्पोर्ट्स क्लबला जागा देण्यास रहिवाशांचाही कडाडून विरोध आहे. नगरसेवकांनी रहिवाशांच्या भावना आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावर आयुक्तांनी ही जागा कोणालाही दिली जाणार नसल्याचे आश्वासन दिले असून, सध्या तरी या प्रकरणावर पडदा पडला असला तरी राजकीय हालचालींमुळे रहिवासी सतर्क आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Wants Park Land; BJP Corporators Strongly Oppose

Web Summary : A dispute arose over a park in Chhatrapati Sambhajinagar. An MLA requested land for a playground, but BJP corporators opposed it, appealing to the municipal commissioner to preserve the park for residents. Locals also oppose the proposal, and the commissioner assured that the land would not be allocated.
टॅग्स :Municipal Corporationनगर पालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर