छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर - अंकाई रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाने आता निर्णायक टप्पा गाठला असून, प्रकल्पाचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५० टक्के काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. दुहेरीकरणामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवासाला मोठी गती मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर २०२१ मध्ये छत्रपती संभाजीनगर - अंकाई (मनमाड) रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली. सर्वेक्षणानंतर दुहेरीकरणाच्या कामालाही मंजुरी मिळाली. निविदा प्रक्रिया होऊन नोव्हेंबर २०२४ मध्ये दुहेरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. कामाची गती वाढण्यासाठी अंकाई ते करंजगाव आणि करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर अशा दोन टप्प्यांत काम सुरू आहे. यासाठी अंकाई ते करंजगाव आणि करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर अशा ४३८ कोटी आणि ४३४ कोटी रुपयांच्या दोन स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या.
सध्या कुठे काम सुरू?नगरसोल - तारुर - रोटेगाव आणि लासूर - पोटूळ - दौलताबाददरम्यान सध्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. दुहेरीकरणाबरोबरच विद्युतीकरणाचेही काम केले जात आहे. त्यासाठी विद्युतीकरणाचे पोलही उभे केले जात आहेत.
दुहेरीकरणामुळे काय बदलणार?- रेल्वेंची संख्या वाढणार.- प्रवासाचा वेळ कमी होणार.- मालवाहतुकीला चालना.- वेळापत्रक अधिक अचूक.- औद्योगिक विकासाला गती.
मुंबईशी कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत- दुहेरीकरणामुळे छत्रपती संभाजीनगर- मुंबई प्रवास अधिक वेगवान व सुलभ.- दुहेरी ट्रॅकमुळे नवीन एक्स्प्रेस रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.- प्रवासाचा वेळ कमी, क्रॉसिंग टळल्याने मुंबई गाठणे होणार जलद.- मुंबईमार्गे देशातील इतर शहरांशी जोडणी अधिक सुलभ होईल.- मुंबईशी वाढलेली कनेक्टिव्हिटी म्हणजे नोकरी-व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल.- शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास सुलभ होईल.- मुंबईतील उपचारांसाठी जाणाऱ्यांच्या वेळेची बचत होईल.
Web Summary : The Chhatrapati Sambhajinagar-Ankai railway doubling project is 50% complete, targeting full completion by June 2027. This upgrade promises faster Mumbai travel, increased train frequency, boosted freight transport, and improved schedule accuracy, fueling industrial growth and enhancing connectivity for jobs, education, and healthcare.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर-अंकाई रेलवे दोहरीकरण परियोजना 50% पूरी, जून 2027 तक समापन का लक्ष्य। यह उन्नयन मुंबई की तेज यात्रा, बढ़ी हुई ट्रेन आवृत्ति, माल परिवहन को बढ़ावा देने और बेहतर समय-सारणी सटीकता का वादा करता है, औद्योगिक विकास को बढ़ावा देता है और नौकरियों, शिक्षा और स्वास्थ्य सेवा के लिए कनेक्टिविटी को बढ़ाता है।