छत्रपती संभाजीनगर : 'काय व्हिडिओ काढता रे, आम्ही डॉन आहोत डॉन', असे म्हणत काही अल्पवयीन टवाळखोर भरदिवसा हातात कोयता घेऊन रस्त्यावर उतरले. महिला, शाळेतून घरी जाणाऱ्या मुलांना शिवीगाळ करून धमकावत होते. रामनगरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील वाढती गुन्हेगारी, नशेखोरी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
स्थानिकांच्या माहितीनुसार, १७ व १६ वर्षीय आकाश, रुपेश (नाव बदलले आहे) परिसरातच राहतात. अनेक दिवसांपासून त्यांच्यासह ६ ते ७ टवाळखोर सातत्याने परिसरात शस्त्रांसह फिरतात. ही टोळी नशेच्या देखील आहारी गेली आहे. बुधवारी आकाश, रुपेश अन्य दोघांसह रामनगरमध्ये एका किराणा दुकानाजवळ उभे राहिले. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला, शाळकरी विद्यार्थ्यांसमोर धारदार कोयता बाहेर काढला. मोठमोठ्याने शिवीगाळ करत धमकावत होते. एका नागरिकाने त्यांचे मोबाइलमध्ये चित्रण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डॉन आहे डॉन, असे म्हणत धमकावून शाळेच्या दप्तरमध्ये कोयता टाकून ते पसार झाले.
टवाळखोर इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थीघाबरलेल्या स्थानिकांनी नगरसेवक मनोज गांगवे यांना घटनेबाबत कळवले. गांगवे यांनी परिसरात धाव घेत मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांना संपर्क साधला. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी दोन्ही अल्पवयीनांना ताब्यात घेतले. दप्तरात कोयता लपवलेल्या मुलाचे घर बंद होते. चौघांपैकी दोघे नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. १७ वर्षीय आकाश काही वर्षे मुंबईत स्थायिक होता. त्याचे वडील पायाने अपंग असून परिसरातच अंडाभुर्जीची गाडी चालवतात.
गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतेय-ऑक्टोबर २०२५ मध्ये दिवाळीदरम्यान याच परिसरात नशेखोरांनी विपुल चाबुकस्वार या तरुणाची रस्त्यावरच कोयत्याने हत्या केली.-आठ दिवसांपूर्वी रामनगरमध्ये एकाने तरुणाला चाकू लावून २७ हजार रुपये रोख रक्कम लुटली.-रामनगर, संजयनगर, म्हाडा कॉलनीत अशा गुन्हेगार, नशेखोरांच्या टोळ्या वाढत आहेत. त्यांच्यावर अपेक्षित कारवाई होत नसल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. विशेष म्हणजे, प्रोझोन मॉलमध्ये चोरी करणारी टोळी याच परिसरातील होती.-रामनगर प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मनपा शौचालय व आसपास रोज नशेखोरांच्या टोळ्या बसलेल्या असतात.
Web Summary : Minor thugs brandishing sickles terrorized Ramnagar, Sambhajinagar, threatening residents and students. The incident highlights rising crime and drug use in the area. Police have apprehended two individuals after locals reported the incident.
Web Summary : संभाजीनगर के रामनगर में सिकल लहराते हुए नाबालिग बदमाशों ने निवासियों और छात्रों को धमकाया। इस घटना ने क्षेत्र में बढ़ते अपराध और नशीली दवाओं के उपयोग को उजागर किया। पुलिस ने स्थानीय लोगों द्वारा घटना की सूचना देने के बाद दो लोगों को गिरफ्तार किया है।