शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात मिळणार स्वस्त-मस्त भाज्या

By admin | Updated: December 16, 2014 01:07 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा प्रकल्प योजनेसाठी औरंगाबाद शहराची निवड केली असून,

औरंगाबाद : केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा प्रकल्प योजनेसाठी औरंगाबाद शहराची निवड केली असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेमुळे नव्या वर्षात शहरवासीयांना स्वस्त आणि मस्त भाज्या मिळणार आहेत. शहरात योजना राबविण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात येत असून, त्यासाठी सुकाणू समिती नियुक्त करण्यात आली आहे. महापालिकेने लवकरात लवकर जागा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना संकरित भाज्या स्वस्त दराने मिळतील. योजनेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भाज्या नागरिकांना खरेदी करता येणार आहेत. यासाठी शहरात २० ते २५ ठिकाणी भाजीपाला विक्री केंदे्र सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने २०११-१२ च्या अर्थसंकल्पामध्ये नागरी समूहाकरिता भाजीपाला पुरवठा प्रकल्पाची घोषणा केली होती. भाजीपाला पुरवठा प्रकल्प एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शहरातील प्रकल्पासाठी राज्यस्तरीय प्रकल्प समितीने ८.५० कोटी रुपये मंजूर केले असून, त्यापैकी ३ कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. भाजीपाला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून येणार आहे. भाजीपाला नाशवंत असल्यामुळे काढणीतोर व्यवस्थापनासाठी पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतवाहन, शीतगृह, कमी ऊर्जा वापरणारे शीतगृह उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प फक्त समूह स्वरूपातच राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महिला शेतकरी, अनुसूचित जाती-जमाती, अल्प व अत्यल्प ाूधारक शेतकरी, नोंदणीकृत महिला आणि पुरुष बचत गट यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.४या योजनेच्या माध्यमातून दलालांची साखळी मोडीत काढण्यात येणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांकडील भाजीपाला थेट ग्राहकांना मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनाही योग्य भाव मिळणार आहे. ४योजनेच्या माध्यमातून विभागातील पाच हजार शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. योजनेसाठी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा समूह तयार करण्यात येणार आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन चांगल्या प्रतीच्या भाज्यांचे उत्पादन करणे शिकविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ताज्या भाज्या मिळतील. योजना राबविण्यासाठी सुकाणू समितीची निवड करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष कृषी सहसंचालक जे. जे जाधव, सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी. डी. लोणारे, सदस्य प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र भोसले, प्रकल्प संचालक शामराव साळुंके, उपसंचालक संतोष आळसे, उपनिबंधक एन.व्ही. अधाने यांच्यासह इतर पंधरा जणांची समितीमध्ये निवड करण्यात आली. या योजनेत २० ते २५ ठिकाणी संकलन व प्रतवारी केंद्र, वितरण केंद्र अशी साखळी उभारण्यात येणार आहे. ४यामध्ये काही ठिकाणी वातानुकूलित तर काही ठिकाणी फिरती विक्री केंद्रे असतील.