दांडीबहाद्दरांना चपराक

By Admin | Updated: November 29, 2014 00:30 IST2014-11-29T00:07:50+5:302014-11-29T00:30:15+5:30

बीड : जिल्हा परिषदेत नियमबाह्यपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीईओ नामदेव ननावरे यांनी शुक्रवारी खणखणीत चपराक दिली़ साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयात पाऊलही

Chaparak to Dandi Bahaddar | दांडीबहाद्दरांना चपराक

दांडीबहाद्दरांना चपराक



बीड : जिल्हा परिषदेत नियमबाह्यपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीईओ नामदेव ननावरे यांनी शुक्रवारी खणखणीत चपराक दिली़ साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयात पाऊलही न ठेवणाऱ्या १३१ कर्मचाऱ्यांकडून खुलासे मागविण्यात आले आहेत़ त्यांचे एक दिवसाचे वेतनही कपात केले जाणार आहे़ उल्लेखनीय म्हणजे सायंकाळी पाच वाजता त्यांनी या सर्व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन ‘हजेरी’ घेत खरडपट्टी काढली़
शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच सीईओ ननावरे जि़प़ मध्ये दाखल झाले़ त्यांनी सव्वा दहा वाजता सर्व विभागांतील हजेरीरजिस्टर मागविले़ त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत हजेरीरजिस्टर त्यांच्या कार्यालयात गोळा झाले़ कर्मचाऱ्यांमार्फत पडताळणी केली तेव्हा सुमारे १३१ कर्मचाऱ्यांच्या हजेरी रजिस्टरवर स्वाक्षऱ्याच नव्हत्या़ सकाळी १० ते सायंकाळी ५:४५ असा जि़प़ चा कार्यालयीन कामकाजाचा वेळ आहे़ दुपारी २ ते २:५० या वेळेत जेवणासाठी सुटी दिली जाते़ मात्र, कार्यालयीन कामकाजाच्या वेळा खूपच कमी कर्मचारी पाळतात़ ननावरे यांनी घेतलेल्या हजेरीत दांडीबहाद्दरांचे पितळ उघड झाले़ दांडीबहाद्दरांना सीईओ ननावरे यांनी विभाप्रमुखांमार्फत दोन दिवसांत खुलासे सादर करण्याच्या सूचना दिल्या असून असमाधानकारक खुलासे आल्यास एक दिवसांचे वेतन कापण्याची तंबी दिली आहे़
दरम्यान, ननावरे यांनी दांडीबहाद्दारांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या़ कामकाजाचा आढावाही घेतला़ (प्रतिनिधी)
सीईओ ननावरे यांनी रुजू झाल्यापासून प्रशासकीय कामकाजात सुधारणेच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे़
४नियमबाह्य कामांना ‘ब्रेक’ लावण्याबरोबरच ढेपाळलेल्या प्रशासनाला ताळ्यावर आणण्यासाठी त्यांनी शिस्तीचा नवा ‘पाठ’ घालून दिला आहे़
४मात्र, कर्मचाऱ्यांच्या अंगवळणी पडलेला ‘लेटलतीफ’ कारभार आणखी काही पूर्णपणे सुधारलेला नाही़
४सीईओ ननावरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कामाच्या वेळेत कोणी गैरहजर राहत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही़ आज फक्त नोटिसा दिल्या़ यानंतर एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई देखील करावी लागेल़
नियमबाह्य कामांसाठी प्रसिद्ध असलेला वित्त व लेखा विभाग दांड्या मारण्यातही अव्वल ठरला़ सर्वाधिक २८ कर्मचारी गैरहजर होते़ आरोग्य विभागातही याहून वेगळी स्थिती नव्हती़ तेथील २४ जण गायब होते़ शिक्षण, बांधकाम वर्ग २, लघुपाटबंधारे, लघुपाटबंधारे उपविभाग येथील प्रत्येकी १० कर्मचारी अनुपस्थित होते़ बांधकाम उपविभागातील ९, बांधकाम वर्ग १ मधील ८ कर्मचाऱ्यांची गैरहजेरी होती़ समाजकल्याण, कृषी विभागातील प्रत्येकी ६ कर्मचारी गायब होते़ पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन विभागातील प्रत्येकी ४ कर्मचाऱ्यांचा आतापता नव्हता़ ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील २ कर्मचारीही गैरहजर होते़

Web Title: Chaparak to Dandi Bahaddar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.