मराठा क्रांती मोर्चाच्या 'बलीदान ते आत्मबलिदान' आंदोलनामुळे गुरुवारी वाहतुकीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 16:26 IST2020-07-22T16:13:40+5:302020-07-22T16:26:52+5:30
मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी काकासाहेब शिंदे यांनी जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली होती. या घटनेला गुरुवारी ( दि. २३ ) दोन वर्ष पूर्ण होत आहेत.

मराठा क्रांती मोर्चाच्या 'बलीदान ते आत्मबलिदान' आंदोलनामुळे गुरुवारी वाहतुकीत बदल
कायगाव : मराठा क्रांती मोर्चाच्या 'बलीदान ते आत्मबलिदान' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ( दि. २३ ) सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी काकासाहेब शिंदे यांनी जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली होती. या घटनेला गुरुवारी ( दि. २३ ) दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने याच ठिकाणी बलीदान ते आत्मबलिदान आंदोलनाचे आयोजन केले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्याचा निर्णय औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घेतला आहे.
असा असेल बदल :
१) औरंगाबाद ते अहमदनगर : औरंगाबाद - बिडकीन - पैठण- शेवगाव- अहमदनगर
२) औरंगाबाद ते नाशिककडे : औरंगाबाद - भेंडाळा फाटा- गंगापूर- वैजापूरमार्गे नाशिक
३) अहमदनगर ते औरंगाबाद : शेवगाव- पैठण- बिडकीनमार्गे औरंगाबाद
४) नाशिक ते औरंगाबाद : वैजापूर- शिऊरमार्गे औरंगाबाद