१० वी, १२ वी परीक्षेच्या कालावधीत बदल
By Admin | Updated: October 6, 2014 00:13 IST2014-10-06T00:05:37+5:302014-10-06T00:13:13+5:30
नांदेड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे.

१० वी, १२ वी परीक्षेच्या कालावधीत बदल
नांदेड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १० वी व १२ वीची परीक्षा गुरुवार २६ सप्टेंबर २०१४ पासून सुरु असून आॅक्टोबर, नोव्हेंबरमधील दसरा व दिपावलीनिमित्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना असलेल्या सुट्या विचारात घेऊन इयत्ता १० वी ची परीक्षा शुक्रवार २६ सप्टेंबर ते शनिवार ११ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत होणार आहे. तर १२ वीची प्रमाणपत्र परीक्षा शुक्रवार २६ सप्टेंबर ते सोमवार २० आॅक्टोबर २०१४ या कालावधीत निश्चित करण्यात आली आहे. १० वीच्या परीक्षेसाठी १ लाख ३७ हजार ९०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १२ वीच्या ९५ हजार ८३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.(प्रतिनिधी)
परिसर स्वच्छता
नांदेड: येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, माणिकनगर येथे म़ गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती करण्यात आली़ तसेच मुख्य रस्त्याची स्वच्छता केली़
विद्यार्थ्यांनी शाळेसमोरी मुख्य रस्त्यावरील स्वच्छता करून व्यावसायिकांना आपल्या दुकानासमोर कचरापेटी ठेवून त्यात कचरा टाकावा, असे आाहन केले़ यावेळी मुख्यध्यापक भगवानराव पवळे उपस्थित होते़