शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन चोरीचे पोलिसांसमोर आव्हान

By admin | Updated: August 31, 2015 13:24 IST

मोबाईलवर फोन करुन बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवत खात्यावरील पैसे परस्पर लाटण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत.

परभणी : मोबाईलवर फोन करुन बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवत खात्यावरील पैसे परस्पर लाटण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत. सहा महिन्यात तब्बल २लाख रुपये अशा पद्धतीने चोरट्यांनी पळविले असून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आता या चोरट्यांच्या मागावर आहे. मोबाईलवर फोन करुन आपण बँक मॅनेजर आहोत, बँकेचे अधिकारी आहोत, अशी बतावणी करीत ग्राहकाच्या बँक खात्याची माहिती, १६ आकडी एटीएमचा क्रमांक आदी गोपनीय माहिती मिळवून ग्राहकाच्या खात्यावरील पैसे परस्पर उचलल्याच्या घटना घडल्या आहेत. ऑनलाईन पैसे चोरीच्या वाढत्या प्रकारामुळे पोलिस यंत्रणाही आरोपींच्या शोधासाठी सर्व बाजूने प्रयत्न करीत आहेत. परंतु, ज्या क्रमांकावरुन असे फोन येतात, हे सर्वमोबाईल बनावट ओळखपत्रांच्या आधारे तयार केले असल्याने पोलिसांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. सहा महिन्यांत अशा प्रकारे चोरीच्या सात घटना घडल्या आहेत. या घटनांमधून २लाख ८ हजार ८५0रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. विशेष म्हणजे, खात्यातील पैसे न उचलता ऑन लाईन शॉपिंग केल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन

■ अनोळखी फोन क्रमांकावरुन कोणी बँक खाते किंवा एटीएम विषयीची गोपनीय माहिती विचारत असल्यास अशा फोन कॉलवर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये. ४/ आपण बक्षीस जिंकले आहे, असा फोन करणार्‍या किंवा फसवे मॅसेज पाठविणार्‍यांवर विश्‍वास न ठेवता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व संबंधितांना कोणतीही माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले आहे.